'इंडियाज गॉट लेटेंट' या युट्यूब रिअॅलिटी शोमध्ये सोशल मीडिया इन्फ्लुएंसर रणवीर अल्लाहाबादिया याने केलेल्या अश्लील वक्तव्यामुळे चांगलाच वाद पेटला. देशभरातून रणवीरबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात होता. अखेरीस या प्रकरणावर समय रैनाने पहिल्यांदाच आपलं मौन सोडलं आहे. त्याने त्याच्या चॅनलवरून 'इंडियाज गॉट लेटेंट' या वादग्रस्त शोचे सर्व व्हिडिओ काढून टाकले आहेत.
advertisement
'ऑल इंडियाज गॉट लेटेंट व्हिडीओ चॅनेलवरून टाकले काढून
अलीकडेच समय रैनाने एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं आहे की, 'जे काही घडत आहे ते हाताळणे माझ्यासाठी सोपं नाही. मी माझ्या चॅनेलवरून सर्व इंडियाज गॉट लेटेंट व्हिडिओ देखील काढून टाकले आहेत. लोकांना हसवणे हे माझे एकमेव ध्येय होतं. या प्रकरणातील पुढील तपासाबाबत, मी सर्व तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेन जेणेकरून त्यांचा तपास निष्पक्षपणे पूर्ण होईल' असं समय रैना म्हणाला.
काय आहे प्रकरण?
समय रैना त्याच्या 'इंडियाज गॉट लेटेंट' शोमुळे सतत चर्चेत असतो. त्याचे व्हिडिओ रिलीज होताच व्हायरल होतात. यावेळी, प्रसिद्ध युट्यूबर आणि पॉडकास्टर रणवीर अल्लाहाबादिया त्याच्या शोमध्ये सामील झाला, शो दरम्यान त्याने पालकांशी संबंधित असा अश्लील प्रश्न विचारला की लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जेव्हा हे प्रकरण वाढले तेव्हा रणवीर आणि समय रैनासह शोच्या आयोजकांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली. आता पहिल्यांदाच, समय रैनाने एक पोस्ट शेअर करून या संपूर्ण प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे.
