घरी उपचार सुरू असतानाच सोमवारी सकाळी त्यांची प्रकृती अचानक बिघडली आणि दुर्दैवाने त्यांचे निधन झाले. मुंबईतील विले पार्ले येथील पवन हंस स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अमिताभ बच्चन, शाहरुख खान, आमिर खान यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती. पुढील महिन्यात ८ डिसेंबर रोजी ते त्यांचा ९० वा वाढदिवस साजरा करणार होते, पण त्यापूर्वीच त्यांच्या निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
सचिन पिळगांवकरांचा भावूक सलाम
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्यांच्यासोबतच्या आठवणींना उजाळा देत सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केल्या. अभिनेते सचिन पिळगांवकर यांनीही अत्यंत हृदयस्पर्शी पोस्ट शेअर करून धर्मेंद्र यांना श्रद्धांजली वाहिली. सचिन पिळगांवकर यांनी धर्मेंद्र यांच्यासोबतचे काही जुने फोटो पोस्ट केले. या दोघांनी 'शोले', 'रेशम की डोरी', 'क्रोधी', 'मझली दीदी' यांसारख्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते.
'वीरू'ला अखेरचा निरोप देताना 'बसंती'च्या अश्रूंचा बांध फुटला, लेक ईशा देओललाही अश्रू अनावर, VIDEO
सचिन पिळगांवकर यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "सर्वांत देखणे, दिग्गज धरमजी आपल्याला सोडून गेले... पण त्यांचा वारसा कायम राहील. मला त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळाली, याबद्दल मी कृतज्ञ आहे. हा रिअल ही-मॅन आपल्या हृदयात कायमच जिवंत राहतील. ओम शांती." सचिन यांच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनीही हळहळ व्यक्त केली असून, सोशल मीडियावर 'धरमजीं'च्या आठवणींना चाहते आणि कलाकारांकडून सलाम केला जात आहे.
