मृत्यूच्या दोन तास आधी सतीश शाह यांचं त्यांची ऑनस्क्रिन बायको आणि सहकलाकार रत्ना पाठक शाह यांच्याशी बोलणं झालं होतं. तेव्हा ते पूर्णपणे ठीक दिसत होते. 'साराभाई वर्सेस साराभाई'चे निर्माते जेडी मजेठिया यांनी सतीश शाह यांच्या शेवटच्या दिवसाबद्दल सांगितलं. सतीश यांनी त्यांच्या मृत्यूच्या फक्त दोन तास आधी रत्ना पाठक यांच्याशी बोलले. ते खूप चांगले मित्र होते. त्यांना अजूनही विश्वास बसत नाही की सतीश आता आपल्यात नाही.
advertisement
मृत्यूच्या दोन तास रत्ना पाठक यांच्याशी बोलले
पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत जेडी मजेठिया म्हणाले, ते आणि सतीश शाह खूप जवळचे मित्र होते. अभिनेत्याने त्यांच्या मृत्यूच्या अगदी आधी फोनवर अनेक जवळच्या मित्रांशी बोलले होते. जेडी म्हणाले, "मला विश्वास बसत नाहीये. तो सकाळी 11 वाजता आतिश कपाडियाशी बोलला. नंतर दुपारी 12:57 वाजता रत्नाजीशी बोलला. त्यानंतर दोन तासांनंतर, मला कळले की तो आता नाही." त्याचबरोबर सतीश शाह यांनी याच वेळेस अभिनेते सचिन पिळगांवकर यांनाही मेसेज केला होता.
जेडी असेही म्हणाले की, आम्ही आदल्या दिवशी भेटणार होतो. मी त्यांच्या घराजवळ होतो पण तो थोडा थकला होता. मी त्याला सांगितले की, माझे कुटुंबही त्याला भेटू इच्छित होते. तो माझ्या मुलींवर खूप प्रेम करतो. तो फोनवर सर्वांशी बोलला. माझ्या कुटुंबाला म्हणाला, "बघा मी कसा दिसतोय. मी किती तंदुरुस्त आहे." त्याने मला नंतर परत येण्यास सांगितले, पण नंतर आता कधीच येणार नाहीये.
मृत्यूआधी काय घडलं?
सतीश शाह यांचे मॅनेजर रमेश कडातला म्हणाले की, सतीश शाह दुपारी 2:30 च्या सुमारास जेवण करताना अचानक बेशुद्ध पडले. त्यांनी ताबडतोब अँम्बुलन्स बोलावली. पण ती यायला अर्धा तास लागला. रुग्णालयात गेल्यानंतर सतीश शाह यांना मृत घोषित करण्यात आलं.
