अभिनेता सुप्रीतचा 7 फेब्रुवारी 2026 रोजी वांद्रे येथे अपघात झाल्याची माहिती त्यानं दिली. सकाळी 7 वाजताच्या सुमारास हा अपघात झाल्याचं त्यानं सांगितलं. त्याच्या डोक्यात असेलल्या हेल्मेटमुळे त्याचा जीव वाचला. सुप्रीतनं अपघातानंतरचा त्याचा फोटो शेअर केला आहे. त्याचा दोन्ही हातांना प्रचंड मार लागला असून हातातून रक्त येताना दिसत आहे.
advertisement
अपघात नेमका कसा झाला हे सुप्रीतनं पोस्टमध्ये सांगितलं. त्याने लिहिलंय, "फोटो टाकण्यामागे कारण अस आहे की बांद्रा कार्टर रोड वर 7 फेब्रुवारी 2026 ला संध्याकाळी 7 वाजता माझं एक्सीडेंट झालं. रस्त्यवरच्या लाइट्स गेलेल्या आणि एक काळ्या रंगाचा कुत्रा रोड क्रॉस करता करता माझ्या बाईक खाली आला."
"संगायचा मुद्दा असा की एक्सीडेंट मोठं झालं पण मी थोडक्यात बचावलो माझ्या हेलमेटमुळे. आपण किती गाडी सेफ चालवत असलो तरी समोरच्या कुठल्या ही गोष्टीमुळे असे प्रसंग कधीही येऊ शकतात. हेलमेटमुळे आपला जीव वाचू शकतो. कृपया करून हेलमेट कंपल्सरी वापरा. धन्यवाद"
सुप्रीतच्या अपघाताची माहिती समोर येताच त्याच्या चाहत्यांनी आणि सहकलाकारांनी काळजी व्यक्त केली आहे. अनेकांनी त्याच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थने केली आहे. सावळ्याची जणू सावली मालिकेतील सावली म्हणजे अभिनेत्री प्राप्ती रेडकर हिनं सुप्रीतच्या पोस्टवर कमेंट करत लिहिलंय, "इतकं लागलंय तरी तो 14 तास शूटींग करतोस. हॅट्स ऑफ." तर सुप्रीतच्या अनेक चाहत्यांनी "लवकर बरा हो, काळजी घे", असं म्हणत त्याला धीर दिलाय.
