अभिनेते सचिन पिळगांवकरांनी मधल्या काळात काही मुलाखतींमध्ये शोलेच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. शोलेमधील अनेक सीन्स सेन्सॉर बोर्डाने कट केले होते. आता अनकट शोलेमध्ये सचिन पिळगांवकर यांचे डिलीट केलेले सीन्स पुन्हा पाहायला मिळणार यामुळे चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. पण ट्रेलरमध्ये सचिन पिळगांवकर यांची एकही झलक दाखवण्यात आली नाही. सचिन पिळगांवकर ट्रेलरमध्ये दिसले नसले तरी एक मराठमोळा अभिनेता मात्र ट्रेलरमध्ये पाहायला मिळाला.
advertisement
'शोले: द फायनल कट' हा कल्ट क्लासिक सिनेमा 12 डिसेंबर 2025 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. यावेळी हा सिनेमा 4k रिस्टोअर केलेल्या वर्जनमध्ये दाखवला जाईल. सिनेमाच्या रि-रिलीजआधी दमदार ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. या ट्रेलरने 'शोले: द फायनल कट' पाहण्याची उत्सुकता चांगलीच ताणली आहे.
'शोले: द फायनल कट' ट्रेलरची सुरुवात जुन्या ट्रेनच्या शिट्टीने होते आणि डाकू ट्रेन लुटतात. शेवटी धर्मेंद्र आणि अमिताभ बच्चन येतात जे पैशाशिवाय काहीही करत नाहीत. ट्रेलरमध्ये ठाकूर जय आणि वीरू यांची मैत्री देखील दाखवण्यात आली आहे. 'शोले: द फायनल कट'च्या ट्रेलरने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. प्रेक्षकांनी ट्रेलर पाहून सिनेमा पाहण्यासाठी उत्सुकता दाखवली आहे.
1975 साली शोले रिलीज झाला होता. सिनेमा रिलीज झाल्यानंतर पहिल्या काही दिवसांत अजिबात चालला नव्हता. सिनेमावर फ्लॉपचा शिक्का पडता पडता राहिला. त्यानंतर सिनेमाला चांगली प्रसिद्धी मिळाली. सिनेमा तब्बल 5 वर्ष थिएटरमध्ये सुरू होता. असे म्हटले जाते की हा सिनेमा मुंबईच्या मिनर्व्हा थिएटरमध्ये पाच वर्षे सुरू होता.
दरम्यान शोलेच्या ट्रेलरमध्ये सिनेमातील सगळी आयकॉनिक पात्र पाहायला मिळाली. त्यांना पाहून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला आहे. पण सचिन पिळगांवकर यांना प्रेक्षकांनी ट्रेलरमध्ये खूप मिस केलं. सचिन पिळगांवकरांनी शोलेमध्ये अहमद ही भूमिका साकारली होती. सचिन पिळगांवकर नाही पण शोलेच्या ट्रेलरमध्ये कालिया म्हणजेच मराठमोळे अभिनेते विजू खोटे यांची झलक पाहायला मिळाली. गब्बर डाकूचा विश्वासू साथीदार त्यांनी साकारला होता. 'सरकार मैंने आपका नमक खाया है' हा त्यांचा आयकॉनिक डायलॉग ऐकून प्रेक्षकांनी आनंद व्यक्त केला.
