सध्या नंदिनीने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल का उचललं? याची अधिकृत पुष्टी झाली नाही. पोलिसांनी याबद्दल अधिक तपशील उघड केलेला नाही. तपास पुढे सरकल्यावर अधिक माहिती दिली जाईल, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
नंदिनीच्या निधनाची बातमी समोर येताच तमिळ दूरचित्रवाणी उद्योगातील अनेक कलाकार तिला श्रद्धांजली वाहण्यासाठी बंगळूरला जाण्याची शक्यता आहे. नंदिनीच्या अचानक झालेल्या निधनाचा कन्नड आणि तमिळ दोन्ही दूरचित्रवाणी उद्योगांतील तिचे सहकारी आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे.
advertisement
धक्कादायक बाब म्हणजे अलीकडेच नंदिनीने काम केलेल्या 'गोवरी'या मालिकेतील तिच्या पात्राने विष प्राशन केलं, असा प्रसंग चित्रित करण्यात आला होता. अगदी त्याच पद्धतीने नंदिनीने जीवन संपवलं का? अशी चर्चा आता सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र तपास अधिकाऱ्यांनी याबाबतचं वृत्त फेटाळून लावलं आहे. तिच्या पडद्यावरील भूमिकेचा तिच्या मृत्यूशी कोणताही संबंध नसल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
मृत्यूच्या वेळी, नंदिनी 'गोवरी' मालिकेत मुख्य भूमिका साकारत होती. ज्यात ती कनक आणि दुर्गा या दोन आव्हानात्मक दुहेरी भूमिका करत होती. या मालिकेतील तिच्या अभिनयामुळे तिला प्रेक्षकांकडून ओळख आणि प्रशंसा मिळाली होती. मूळची कोत्तूरची रहिवासी असलेली नंदिनी बंगळूरमध्ये राहत होती. तिने 'जीवा हूवागिदे', 'संघर्ष', 'मधुमगलू' आणि 'नीनादे ना' यांसारख्या अनेक लोकप्रिय कन्नड मालिकांमध्ये काम केलं होतं. नंदिनी सीएमच्या मृत्यूमुळे दूरचित्रवाणी क्षेत्रात शोककळा पसरली आहे.
