उपासना सिंहने अलीकडेच IANS ला मुलाखत दिली आहे. अभिनेत्री म्हणाली की, "सर्वसामान्य लोकांना वाटतं की, फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम करणारे सर्वच कलाकार खूपच ग्लॅमरस, आलिशान आणि आरामात आयुष्य जगतात. पण खरं तर सत्य याच्या अगदी उलट आहे." अभिनेत्रीने पुढे सांगितले की 'सिने अँड टीव्ही आर्टिस्ट्स असोसिएशन' (CINTAA) ची सरचिटणीस म्हणून आलेल्या अनुभवांवरून तिनं हे वास्तव मांडलंय. "अनेक कलाकार दिवसाला केवळ 1200 ते 5000 रुपये कमावू शकतात. त्यातून अनेकांचे पैसेही कापले जाते. काहींना तर पूर्ण वर्षात केवळ 4 ते 5 दिवसच काम मिळतं."
advertisement
"हा काही थोडा- फार पगार मिळतोय, त्यातही कलाकारांना कपातीचा सामना करावा लागतो. समजा, 5000 रुपयांच्या पर डे मानधनातली 25% रक्कम वजा केली जाते, असा दावाही तिनं केला. इतकं काम करूनही कलाकारांना त्यांच्या हक्काचे पैसे लगेचच मिळत नाही. कलाकारांना आपले हक्काचे पैसे मिळण्यासाठी 90 ते 120 दिवस वाट पाहावी लागते. जरा विचार करा, जर कोणी दिवसाला 5000 रूपये कमवत असेल, तर त्यातून महिन्याला 25,000 रूपये TDS म्हणून टॅक्स कापला जातो. त्यानंतर, कोऑर्डिनेटर त्यातून त्याचे कमिशन घेतो. मग त्यातही किती पैसे उरले? आणि हे मुंबईसारख्या शहरात घराचं भाडं, मुलांच्या शाळेची फी आणि दररोजचा खर्च हे सर्व मोठ्या प्रमाणावर आहे, तिथं एवढ्या कमी पैशात जगणं अशक्य आहे."
अभिनेत्रीने शेअर केलेल्या या रिॲलिटीमुळे अनेकांचे डोळे उघडले आहेत. उपासना एक हिंदी टेलिव्हिजन अभिनेत्री असून तिने आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे. अनेक लोकप्रिय टेलिव्हिजन सीरियलमध्ये तिने काम केलेले आहे.
