TRENDING:

मुंग्या घरात का येतात? कारण तुम्हाला माहितीय का? संशोधन समोर आल्या काही धक्कादायक गोष्टी

Last Updated:

मुंग्या घरात का येतात? पृथ्वीवर त्यांची संख्या किती? मुंग्या उंच इमारतींमध्ये कशा पोहोचतात? अशा अनेक प्रश्नांवर एका नव्या संशोधनाने प्रकाश टाकला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सिडनी: मुंग्या या पृथ्वीवरील सर्वात यशस्वी जीवांपैकी एक मानल्या जातात. जगभरात त्यांची सुमारे 22,000 प्रजाती आढळतात. उष्णकटिबंधीय ऑस्ट्रेलियामध्ये मुंग्यांची मोठी जैवविविधता आहे आणि एकट्या त्या भागात सुमारे 5,000 प्रजाती असल्याचे संशोधकांचे मत आहे. मुंग्या पृथ्वीवर इतक्या मोठ्या प्रमाणात अस्तित्वात असल्याने त्यांचा आपल्या घरात प्रवेश होणे काही आश्चर्यकारक नाही. पण त्या आपल्या घरात कशा आणि का येतात? आणि त्या रोखण्यासाठी कोणते उपाय करता येऊ शकतात? हे जाणून घेऊया.
News18
News18
advertisement

मुंग्या आपल्या घरात का येतात?

मुंग्या अत्यंत सामाजिक प्राणी असून त्या एका संघटित पद्धतीने जीवन जगतात. त्यांच्या वसाहतींमध्ये हजारो कामकरी मुंग्या असतात. ज्या अन्न, पाणी आणि सुरक्षित ठिकाणाच्या शोधात असतात. एका संशोधनानुसार पृथ्वीवर एका वेळी सुमारे 20 क्वाड्रिलियन (20 पाठोपाठ 15 शून्य असलेली संख्या) मुंग्या अस्तित्वात असतात. मानवी लोकसंख्येच्या तुलनेत हे प्रमाण खूप मोठे आहे. त्यामुळेच घरांमध्ये त्यांचा शिरकाव होतो.

advertisement

 अन्नाच्या शोधात 

मुंग्या अन्नाच्या वासाकडे विशेष संवेदनशील असतात. अगदी छोट्या प्रमाणात साखर, ब्रेडचे तुकडे, फळांचे रस, किंवा उरलेले अन्न जरी घरात पडले तरी मुंग्या ते शोधून काढतात. एकदा एखाद्या मुंगीला अन्नाचा स्रोत सापडला की ती फेरोमोन नावाचे रसायन सोडते. ज्यामुळे इतर मुंग्यांना तो मार्ग सापडतो. त्यामुळे जर एक मुंगी अन्नाच्या दिशेने गेली. तर काही वेळातच इतर मुंग्या त्या ठिकाणी पोहोचतात.

advertisement

पाण्याच्या शोधात 

मुंग्या केवळ अन्नच नव्हे, तर पाण्याच्या शोधातही घरात शिरतात. विशेषतः उष्ण हवामानात किंवा पावसाळ्यात ज्या ठिकाणी ओलावा अधिक असतो तेथे मुंग्यांचा वावर वाढतो. बाथरूम, सिंक, गच्ची, किंवा भिंतींतील लहान भगदाडे यामध्ये मुंग्या आढळू शकतात.

उंच इमारतींमध्ये कशा पोहोचतात?

खूप उंच मजल्यावरील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या लोकांना देखील मुंग्यांचा त्रास जाणवतो. त्याचे कारण म्हणजे मुंग्यांच्या पायांची विशेष रचना. त्यांच्या पायांवरील चिपकणारे छोटे केस आणि सूक्ष्म संरचना त्यांना गुळगुळीत भिंतींवरही सहज चढण्यास मदत करतात. तसेच त्या भिंतींमधील लहान अंतरांमधून किंवा विजेच्या तारा, पाईप्स यांच्यामार्गे सहज घरात पोहोचू शकतात.

advertisement

मुंग्या टाळण्यासाठी काय करता येईल?

1. अन्नसाठा योग्यरित्या ठेवा – साखर, पीठ, तूप यासारखी अन्नपदार्थ सीलबंद डब्यांमध्ये ठेवा.

2. स्वच्छता राखा – स्वयंपाकघर आणि जेवणाचे ठिकाण स्वच्छ ठेवा. गळालेल्या पदार्थांची साफसफाई त्वरित करा.

3. ओलसर जागा टाळा – बाथरूम आणि स्वयंपाकघर कोरडे ठेवा. सिंकमधील नळ गळत असेल तर त्वरित दुरुस्त करा.

advertisement

4. प्रवेशद्वार सीलबंद ठेवा – खिडक्या, दरवाजे आणि भिंतीतील लहान भगदाडे बुजवा.

5. मुंग्यांचे फेरोमोन मार्ग तोडा – व्हिनेगर किंवा ब्लीचने त्यांच्या फेरोमोन ट्रेल पुसून टाका.

 पर्यावरणासाठी किती महत्त्वाच्या आहेत?

मुंग्या केवळ अन्न शोधणारे जीव नाहीत तर त्या निसर्गाच्या स्वच्छता व्यवस्थेचा एक महत्त्वाचा भाग आहेत. त्या मातीची सुपीकता वाढवतात, कचरा साफ करतात, तसेच इतर कीटकांवर नियंत्रण ठेवतात. त्यामुळे घरात काही मुंग्या आल्या तरी लगेच कीटकनाशकांचा वापर करण्याऐवजी त्यांना रोखण्यासाठी स्वच्छतेसह योग्य उपाय करावेत.

मुंग्या आपल्या जगण्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पण त्या आपल्या घरात येऊ नयेत यासाठी आवश्यक खबरदारी घेणे गरजेचे आहे.

मराठी बातम्या/Explainer/
मुंग्या घरात का येतात? कारण तुम्हाला माहितीय का? संशोधन समोर आल्या काही धक्कादायक गोष्टी
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल