TRENDING:

दुर्मिळ घातक अमीबाचे थैमान, Brain Eating Amoebaमुळे भारतात 5 जणांचा मृत्यू, डॉक्टरही हादरले

Last Updated:

Brain Eating Amoeba Explainer: केरळमध्ये नाकेतून शरीरात घुसून थेट मेंदू खाणारा अमीबा आढळल्याने खळबळ उडाली आहे. या संसर्गाने 11 जणांना बाधा झाली असून एका रुग्णाची प्रकृती गंभीर आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
News18
News18
advertisement

सध्या केरळमध्ये एका दुर्मिळ अमीबामुळे (Amoeba) लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हा अमीबा नाकावाटे शरीरात प्रवेश करतो आणि थेट मेंदूपर्यंत पोहोचतो. एकदा का तो मेंदूत पोहोचला की, लाखो अमीबांची निर्मिती करतो, जे मेंदूच्या ऊती (Tissue) खाऊन टाकतात. जर या अमीबाने मेंदूला संसर्ग केला, तर वाचण्याची शक्यता जवळपास नसतेच. या आजाराला ‘अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस’ (Amebic Meningoencephalitis) असे म्हणतात.

advertisement

केरळमधील कोळिकोड मेडिकल कॉलेजमध्ये ११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. हा अमीबा मुख्यतः गोड्या पाण्याच्या तलावांमध्ये, नद्यांमध्ये, गरम पाण्याच्या झऱ्यांमध्ये आणि कधीकधी मातीतही आढळतो. हा रोग दुर्मिळ असला तरी अत्यंत घातक आहे आणि केरळमध्ये आरोग्यविषयक चिंतेचे कारण बनला आहे.

advertisement

प्रश्न आणि उत्तरे

प्रश्न: मेंदू खाणाऱ्या या अमीबाचे नाव काय आहे?

उत्तर: या अमीबाचे नाव 'नाएग्लेरिया फॉवलेरी' (Naegleria fowleri) आहे. हा एक मुक्त-जीवी अमीबा आहे जो 'प्रायमरी अमीबिक मेनिंगोएन्सेफलाइटिस' नावाचा एक दुर्मिळ पण जीवघेणा आजार निर्माण करतो. हा अमीबा नाकावाटे शरीरात घुसतो आणि मेंदूत पोहोचून तेथील पेशींचा नाश करतो.

advertisement

प्रश्न हा अमीबा सर्वत्र आढळतो का?

नाही. तो सर्वत्र नसतो. नाएग्लेरिया फॉवलेरी प्रामुख्याने गरम गोड्या पाण्याच्या स्रोतांमध्ये आढळतो. जसे की तळी, नद्या, गरम झरे, आणि कधी मातीमध्येही. तो 30°C पेक्षा जास्त तापमानाच्या पाण्यात वाढतो. थंड किंवा खाऱ्या पाण्यात तो वाढत नाही. तो जगभर कुठेही आढळू शकतो. विशेषतः उष्ण हवामान असलेल्या ठिकाणी जसे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, भारत इ. भारतात काही प्रकरणे नोंदली गेली आहेत, पण हा सर्वत्र आढळणारा नाही.

advertisement

प्रश्न याचा शोध कसा लावला जातो?

याचा शोध फक्त वैद्यकीय किंवा प्रयोगशाळेच्या तपासणीतून लागतो. पाण्याचे नमुने घेऊन मायक्रोस्कोपखाली गतिशील ट्रोफोजोइट्स पाहिले जातात. याला कल्चरिंग करून विशेष माध्यमात उगवले जाते. पीसीआर तपासणी पाण्याच्या नमुन्यातून हा अमीबा झटपट शोधून काढू शकते. सध्या केरळमध्ये या तपासणीची मागणी वाढली आहे.

प्रश्न जर हा मानवाला संक्रमित करतो, तर त्याचा शोध कसा लागतो?

यासाठी सीएसएफ टेस्ट (स्पाइनल फ्लुइड तपासणी) केली जाते. मणक्याच्या हाडातून घेतलेल्या द्रवात मायक्रोस्कोपखाली हा अमीबा दिसतो. साइटोसेंट्रीफ्यूगेशन आणि विशेष रंगद्रव्यांनी रंगवून अमीबाला ओळखले जाते. पीसीआर टेस्टही वापरली जाते.

प्रश्न लक्षणे काय असतात?

डोकेदुखी, ताप, उलटी, मान आखडणे ही प्राथमिक लक्षणे आहेत. अशी लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांकडे जावे. कारण आजार जलद गतीने घातक ठरतो. याचा निदान बहुतेकदा संसर्गानंतरच होतो. नाकेतून गरम पाणी जाऊ न देणे गरजेचे आहे. नदीत किंवा स्विमिंग पूलमध्ये आंघोळ करताना तो नाकेतून आत जाऊ शकतो.

प्रश्न हा अमीबा औषधाने नष्ट होतो का?

या अमीबामुळे होणारा प्राइमरी अमीबिक मेनिन्जोएन्सेफेलाइटिस अतिशय गंभीर असतो. बहुतांश प्रकरणांमध्ये तो घातक ठरतो. काही औषधे आणि उपचार वापरले जातात, पण ते फार कमी प्रकरणांत यशस्वी होतात आणि तोही फक्त लवकर निदान झाल्यास. बहुतेक प्रकरणांत मृत्यू होतो कारण अमीबा अतिशय वेगाने मेंदू नष्ट करतो.

प्रश्न अमीबा ब्रेनमध्ये पोहोचला आहे हे कधी कळते?

संसर्गानंतर 1 ते 9 दिवसांत लक्षणे सुरू होतात. एकदा अमीबा मेंदूत पोहोचला की तो वेगाने पेशींचा नाश करतो. काही दिवसांतच गंभीर मेंदू नुकसान किंवा मृत्यू होऊ शकतो. तो न्यूरॉन्स "खाऊन" टाकतो आणि मेंदूत सूज (एन्सेफलाइटिस) निर्माण करतो. बहुतांश रुग्ण 1-2 आठवड्यांत मृत्युमुखी पडतात.

प्रश्न हा अमीबा आकाराने मोठा होतो का?

नाही. अमीबाचा आकार 10-25 मायक्रोमीटर इतकाच असतो, जो डोळ्यांना दिसत नाही. पण मेंदूत पोहोचल्यानंतर लाखोंच्या संख्येने नवे अमीबा निर्माण होतात. मेंदूतील पोषकद्रव्ये आणि गरम वातावरण त्याच्या वाढीस पूरक असते. तो एन्झाइम्स आणि विषारी पदार्थ सोडतो, ज्यामुळे मेंदूत सूज आणि रक्तस्त्राव होतो.

प्रश्न हा सर्व नद्या, तलावामध्ये असतो का?

नाही. तो फक्त 25°C ते 40°C तापमानाच्या गोड्या पाण्यात वाढतो. गरम झरे यासाठी आदर्श असतात. नीट क्लोरीनेट न केलेल्या स्विमिंग पूलमध्येही तो वाढू शकतो.

प्रश्न कुठे आढळत नाही?

समुद्राच्या खाऱ्या पाण्यात 15°C पेक्षा कमी तापमानाच्या पाण्यात आणि नीट क्लोरीनेट केलेल्या पाण्यात तो राहत नाही.

प्रश्न सर्व जलस्रोत धोकादायक असतात का?

नाही. हे फारच दुर्मिळ आहे. आणि यामुळे होणारा संसर्ग तर त्याहूनही दुर्मिळ आहे.

प्रश्न गिझरच्या पाण्यात हा अमीबा वाढतो का?

गिझरमध्ये साधारण 50°C ते 70°C तापमानाचे पाणी साठवलेले असते, जे या अमीबासाठी प्रतिकूल आहे. तो 46°C पेक्षा जास्त तापमानात जिवंत राहू शकत नाही. पण जर गिझरचे तापमान कमी (30°C-40°C) असेल आणि पाणी बराच वेळ साठवलेले असेल, तसेच ते आधीच दूषित असेल, तर वाढ होऊ शकते.

प्रश्न पाणी प्यायल्याने संक्रमण होते का?

नाही. पोटात गेल्यावर तो आम्लीय वातावरणात नष्ट होतो. तो फक्त नाकेतून गेल्यास धोकादायक ठरतो. उदा. आंघोळीच्या वेळी किंवा नाक धुण्यासाठी (नेटी पॉट) वापरल्यास.

प्रश्न नळाच्या पाण्यात हा असू शकतो का?

नळाच्या पाण्यात तो तेव्हाच असतो जेव्हा पाण्याचा स्रोत दूषित असतो आणि त्याचे योग्य ट्रीटमेंट झालेले नसते. तो 25°C ते 40°C गोड्या पाण्यात वाढतो. ट्रीटेड (क्लोरीनेटेड) पाण्यात तो राहत नाही. जर नळाचे पाणी थेट नदी, तळे किंवा विहिरीतून येत असेल आणि योग्य क्लोरीनेशन/फिल्टरेशन नसेल, तर तो असू शकतो. जुनी, घाणेरडी पाईपलाईनही त्याला पोषक वातावरण देऊ शकते. विशेषतः उष्ण हवामान असलेल्या भागात जर नळाचे पाणी 30°C-40°C गरम असेल आणि ट्रीटेड नसेल, तर धोका वाढतो.

मराठी बातम्या/Explainer/
दुर्मिळ घातक अमीबाचे थैमान, Brain Eating Amoebaमुळे भारतात 5 जणांचा मृत्यू, डॉक्टरही हादरले
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल