TRENDING:

चीनच्या प्रयोगाने Science हादरलं, स्त्रीशिवाय संतती निर्माण; दोन पुरुषांच्या DNA मधून जन्माला आले जिवंत बाळ

Last Updated:

Science News in Marathi:चीनमधील वैज्ञानिकांनी केवळ दोन नर उंदरांच्या डीएनएमधून एक जिवंत आणि प्रजननक्षम उंदीर तयार करून विज्ञानजगतात खळबळ माजवली आहे. ना अंडाणु, ना आई – फक्त दोन शुक्राणूंमधून झालेला हा प्रयोग भविष्यातील जैववैज्ञानिक दिशा बदलण्याची क्षमता ठेवतो.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विज्ञानाने यंदा निसर्गाच्या मर्यादांना थेट आव्हान दिले आहे. चीनच्या जियाओतोंग विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी एक असा उंदीर तयार केला आहे, जो केवळ दोन नर उंदरांच्या डीएनएमधून जन्माला आला आहे. म्हणजे न कोणती आई, न अंडाणु… फक्त दोन शुक्राणूंमधून हा जन्म शक्य झाला. हा प्रयोग यशस्वी ठरला आणि विशेष बाब म्हणजे यापासून जन्मलेला उंदीर निरोगी असून प्रजननक्षमही आहे. म्हणजेच तो पुढे संततीही जन्माला घालू शकतो. हा स्टडी 23 जून 2025 रोजी 'Proceedings of the National Academy of Sciences (PNAS)' या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. या यशाने जेनेटिक्स आणि रिप्रोडक्टिव बायोलॉजीमध्ये क्रांती घडवून आणली आहे.
News18
News18
advertisement

या प्रयोगात वैज्ञानिकांनी एपिजेनेटिक प्रोग्रामिंग म्हणजेच मिथाइलेशन पॅटर्नमध्ये बदल करून नवी पद्धत वापरली. मिथाइलेशन ही अशी प्रक्रिया आहे जी डीएनएच्या क्रियाशीलतेवर परिणाम करते, पण डीएनए सीक्वेन्समध्ये बदल करत नाही. दोन वेगवेगळ्या नर उंदरांचे शुक्राणू वापरले गेले – एक लॅबमध्ये तयार करण्यात आलेला आणि दुसरा थायलंडच्या वाइल्ड माउस प्रजातीचा. एका अंडाणूमधून त्याचा जीनोम काढून टाकण्यात आला आणि त्यात दोन नर शुक्राणूंची हेड्स इंजेक्ट करण्यात आली. यापैकी एका शुक्राणूचा मिथाइलेशन पॅटर्न स्त्रीच्या डीएनएमध्ये असल्याप्रमाणे बनवण्यात आला.

advertisement

अशा प्रकारे तयार झालेल्या भ्रूणात दोन्ही डीएनए स्त्रोत पुरुष होते. तो एका मादी उंदरामध्ये प्रत्यारोपित करण्यात आला आणि त्यातून तीन जिवंत उंदीर जन्माला आले. यापैकी एक पिल्लू आकाराने खूप मोठे असल्यामुळे जन्माच्या दुसऱ्या दिवशी मरण पावले, पण उर्वरित दोन पिल्ले निरोगी होती आणि त्यातील एक प्रजननक्षम देखील निघाले.

ही पहिली वेळ नाही जेव्हा शास्त्रज्ञांनी एकाच लिंगातून संतती निर्माण करण्याचा प्रयत्न केला. 2004 मध्ये जपानमध्ये दोन मादी उंदरांमधून संतती जन्माला आली होती. ज्याला ‘कगुया’ नाव देण्यात आले होते. मात्र दोन नरांमधून संतती निर्माण करण्याचे प्रयत्न यापूर्वी अयशस्वी ठरले होते. 2018 मध्ये एका प्रयोगात दोन नर उंदरांचे जीन्स वापरून भ्रूण तयार करण्यात आला. पण जन्मल्यानंतर एक दिवसातच तो मरण पावला. यावेळी चिनी वैज्ञानिकांनी जीन डिलीशनऐवजी मिथाइलेशनच्या माध्यमातून एपिजेनेटिक रीप्रोग्रामिंग केली. त्यामुळे भ्रूण अधिक निरोगी राहिला आणि त्याची जीवनक्षमता जास्त होती.

advertisement

University College London येथील असोसिएट प्रोफेसर हेलेन ओ’नील यांच्या मते, हा प्रयोग सिद्ध करतो की स्तनधारी प्राण्यांमध्ये एका लिंगातून संतती निर्माण करण्यामध्ये मुख्य अडथळा म्हणजे जीनोमिक इम्प्रिंटिंग असतो. आणि आता कदाचित तो पार केला जाऊ शकतो.

advertisement

या प्रयोगामुळे हे दिसून आले आहे की नैसर्गिकरीत्या आवश्यक समजले जाणारे जीन इम्प्रिंटिंग पॅटर्न विज्ञानाच्या मदतीने बदलले जाऊ शकतात. जीनोमिक इम्प्रिंटिंगमध्ये स्त्री व पुरुष त्यांच्या डीएनएमध्ये विशिष्ट रासायनिक बदल करतात जे भ्रूणाच्या विकासासाठी आवश्यक असतात. आता हे प्रयोगशाळेत यशस्वीपणे रीप्रोग्राम करण्यात आले आहेत.

पण माणसांवर हा प्रयोग होईल का? याचे उत्तर म्हणजे – नाही. वैज्ञानिकांनी स्पष्ट केले आहे की ही तंत्रज्ञान माणसांवर वापरणे शक्य नाही. कारण त्यासाठी फारच कमी यशाची शक्यता आहे, हजारो अंड्यांची गरज लागते आणि अनेक सरोगेट महिलांचीही आवश्यकता भासते. Sainsbury Wellcome Centre चे क्रिस्टोफ गालिचे यांच्या मते, माणसांमध्ये ही तंत्रज्ञान वापरणे केवळ अव्यवहार्य नाही, तर नैतिकदृष्ट्याही अत्यंत संवेदनशील आहे.

advertisement

जरी ही यशस्वी प्रक्रिया थेट माणसांवर वापरता येणार नाही, तरीही यामुळे प्रजननशास्त्र, अनुवंशिक वंध्यत्व आणि क्लोनिंगसारख्या क्षेत्रात नवी वाट मोकळी होऊ शकते. याशिवाय ही प्रक्रिया भविष्यामध्ये अंतराळ प्रवास, पशुपालन आणि नामशेष प्रजातींना पुन्हा जीवन देण्यास मदत करू शकते.

मराठी बातम्या/Explainer/
चीनच्या प्रयोगाने Science हादरलं, स्त्रीशिवाय संतती निर्माण; दोन पुरुषांच्या DNA मधून जन्माला आले जिवंत बाळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल