TRENDING:

उद्या तिसरा 'धक्का', PM मोदींसाठी 5 ऑगस्ट का महत्त्वाचे? पुन्हा एकदा इतिहास घडणार, राजकीय वर्तुळात खळबळ

Last Updated:

Prime Minister Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी एकाच दिवशी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वतंत्रपणे भेट घेतली. या भेटींमुळे राजधानी दिल्लीतील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
नवी दिल्ली: संसदेत पावसाळी अधिवेशन चालू असतानाच केंद्र सरकारमधील सर्वाधिक शक्तिशाली दोन चेहरे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी रविवारी (3 ऑगस्ट) राष्ट्रपती भवनात स्वतंत्रपणे भेट घेतली. पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर अवघ्या चार तासात अमित शाहही राष्ट्रपती भवनात दाखल झाले आणि यामुळे दिल्लीच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
News18
News18
advertisement

मोदी-शाह यांच्या राष्ट्रपती भेटीमागे काय आहे?

या भेटींविषयी राष्ट्रपती भवन किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. त्यामुळे ही भेट केवळ औपचारिक होती का, की कुठल्या विशिष्ट निर्णयासंदर्भात होती, याबाबत तर्कवितर्क सुरु झाले आहेत. विशेष म्हणजे मोदी आणि शाह यांची राष्ट्रपतीशी स्वतंत्रपणे भेट घडून येणं ही दुर्मीळ घटना आहे. सामान्यतः अशा भेटी औपचारिक वा कोणत्या कार्यक्रमानिमित्त असतात.

advertisement

राजकीय चर्चा आणि संभाव्य निर्णय

राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे की- ही भेट संसदेत काही महत्त्वाचे विधेयक सादर करण्याच्या पार्श्वभूमीवर झाली असावी. विशिष्टतः युनिफॉर्म सिव्हिल कोड (UCC) लागू करण्याबाबत सध्या मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु आहे. राम मंदिर आणि अनुच्छेद 370 नंतर UCC हेच भारतीय जनता पक्षाच्या अजेंड्यातील शिल्लक प्रमुख धोरण मानलं जातं. उत्तराखंडमध्ये ते लागू झालं असून गुजरात आणि आसामनेदेखील राज्यस्तरावर ते आणण्याचे संकेत दिले आहेत.

advertisement

5 ऑगस्टचा कनेक्शन – महत्त्वाची तारीख?

ही भेट अशा वेळी झाली आहे जेव्हा 5 ऑगस्ट जवळ आलेली आहे. एक अशी तारीख जी मोदी सरकारसाठी प्रतीकात्मक ठरली आहे.

5 ऑगस्ट 2019: जम्मू-काश्मीरमधून अनुच्छेद 370 हटवण्यात आला.

5 ऑगस्ट 2020: अयोध्येतील राम मंदिराचा शिलान्यास झाला.

त्यामुळे या पार्श्वभूमीवर असे बोलले जात आहे की, 5 ऑगस्ट 2025 रोजीही सरकार मोठा घटनात्मक किंवा राजकीय निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.

advertisement

उपराष्ट्रपती निवडणुकीचाही संबंध?

या घडामोडींचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाली आहे. विद्यमान उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पावसाळी अधिवेशनाच्या प्रारंभीच राजीनामा दिला होता. 9 सप्टेंबर 2025 रोजी मतदान होणार असून 7 ऑगस्ट रोजी अधिकृत अधिसूचना निघणार आहे. त्यामुळे अशी शक्यता आहे की मोदी-शाह यांनी राष्ट्रपती मुर्मूंशी याच संदर्भात चर्चा केली असेल.

advertisement

आंतरराष्ट्रीय पार्श्वभूमी – ट्रम्प आणि जागतिक दबाव

ही भेट अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर 25% टॅरिफ लावण्याचा इशारा दिल्यानंतर आणि भारताच्या रशियासोबतच्या लष्करी व्यवहारांवर निर्बंधांची धमकी दिल्यानंतर काही दिवसांनी झाली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय राजकारणाचा संबंध या भेटीशी असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
Recipe: रोज नाश्त्याला पोहे खाऊन कंटाळलात? मग पोह्यांची ही रेसिपी ट्राय करा
सर्व पहा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याशी एकाच दिवशी स्वतंत्रपणे भेट ही केवळ औपचारिक नव्हती, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. यामागे 5 ऑगस्टचा संभाव्य निर्णय, UCC सारखं मोठं विधेयक, उपराष्ट्रपती निवडणूक किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडी यांचा संबंध असू शकतो. यामुळे दिल्लीच्या सत्ताकेंद्रात सध्या ‘काहीतरी मोठं घडणार’ याची जोरदार चर्चा सुरु आहे.

मराठी बातम्या/Explainer/
उद्या तिसरा 'धक्का', PM मोदींसाठी 5 ऑगस्ट का महत्त्वाचे? पुन्हा एकदा इतिहास घडणार, राजकीय वर्तुळात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल