TRENDING:

ज्यांनी आमदाराचा सिंदूर पुसला, त्यालाच योगींनी संपवलं; लग्नानंतर 9 दिवसांत झाला होता पतीचा खून, 20 वर्षांनी पुन्हा चर्चेत पूजा पाल

Last Updated:

Pooja Pal suspended: उत्तर प्रदेश विधानसभेत पूजा पाल यांनी अतीक अहमदविरुद्ध बोलल्यानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षातून बाहेर काढले. पूजाचे पती राजू पाल यांचा खून अतीक अहमदने 2005 साली केला होता.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
उत्तर प्रदेशातील प्रयागराजमध्ये दोन वर्षांपूर्वी यूपीचे माजी खासदार आणि माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांना गोळ्या झाडून ठार मारण्यात आले होते. तेव्हा ते पोलिसांच्या ताब्यात होते आणि नियमित तपासणीसाठी त्यांना रुग्णालयात नेण्यात आले होते.
News18
News18
advertisement

अतीकचा मुलगा असद यालाही झाशीतील चकमकीत ठार करण्यात आले. तो उमेश पाल हत्याकांडात आरोपी होता. आता पुन्हा एकदा अतीक अहमद आणि त्याचे गुन्हेगार कारनामे चर्चेत आहेत. यावेळी कारण ठरली आहे समाजवादी पक्षाची (सपा) आमदार पूजा पाल.

पूजाचे पती आणि आमदार राजू पाल यांचा खून अतीक अहमदने 2005 साली केला होता.

advertisement

गुरुवारी उत्तर प्रदेश विधानसभेत व्हिजन 2047 वर चर्चा सुरू होती. सपा तर्फे पूजा पाल यांना भाषणाची संधी मिळाली. प्रयागराज पश्चिमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पूजांनी या वेळी अतीक अहमदचा उल्लेख केला. त्यांनी म्हटले- मी माझा पती गमावला आहे. सगळ्यांना ठाऊक आहे की त्यांची हत्या कशी झाली आणि कोणी केली. मुख्यमंत्री योगीजींनी मला न्याय दिला, जेव्हा कोणी ऐकायला तयार नव्हते. प्रयागराजमधील माझ्यासारख्या अनेक महिलांना न्याय मिळवून दिला आणि गुन्हेगारांना शिक्षा केली.

advertisement

त्यांनी पुढे मुख्यमंत्रींच्या शून्य सहनशीलता धोरणाचे समर्थन केले.

मी लढत राहिले, जेव्हा कोणी अतीक अहमदसारख्या गुन्हेगारांविरुद्ध उभे राहण्यास तयार नव्हते. जेव्हा मी या लढाईत थकले, तेव्हा मुख्यमंत्री योगींनी मला न्याय दिला. आज संपूर्ण राज्य त्यांच्याकडे विश्वासाने पाहत आहे, असे पूजांनी सांगितले.

एक तासात पक्षातून हकालपट्टी

पूजांच्या या विधानानंतर सपा प्रमुख अखिलेश यादव यांनी त्यांना पक्षातून बाहेर काढले. पक्षाने म्हटले – पूजा पाल वारंवार पक्षविरोधी भूमिका घेत होत्या. चेतावणी देऊनही त्यांनी ती थांबवली नाही, ज्यामुळे पक्षाचे नुकसान झाले. त्यामुळे त्यांना तात्काळ सपा मधून निलंबित करण्यात आले.

advertisement

पूजा पाल कोण आहेत?

पूजा पाल या दिवंगत आमदार राजू पाल यांच्या पत्नी आहेत. १६ जानेवारी २००५ रोजी त्यांचा विवाह धूमनगंज येथील उमरपूर नीवाचे रहिवासी राजू पाल यांच्याशी झाला. त्या वेळी राजू पाल हे इलाहाबाद शहर पश्चिम मतदारसंघातून बसपाचे आमदार होते.

लग्नानंतर केवळ ९ दिवसांनी म्हणजेच २५ जानेवारी २००५ रोजी त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. यात माफिया अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांची नावे समोर आली. पतीच्या हत्येनंतर पूजा घाबरल्या नाहीत आणि गुन्हेगारांना शिक्षा मिळवून देण्यासाठी लढत राहिल्या.

advertisement

२००७ मध्ये त्यांनी प्रयागराज पश्चिम येथून बसपाच्या तिकिटावर निवडणूक लढवून विजय मिळवला. २०१२ मध्ये त्याच जागेवरून अतीक अहमदला पराभूत केले. २०१७ मध्ये पुन्हा बसपाच्या तिकिटावर लढल्या पण पराभूत झाल्या. नंतर २०२२ मध्ये सपा तर्फे कौशांबीच्या चायल सीटवरून निवडणूक लढवली आणि आमदार झाल्या.

मराठी बातम्या/Explainer/
ज्यांनी आमदाराचा सिंदूर पुसला, त्यालाच योगींनी संपवलं; लग्नानंतर 9 दिवसांत झाला होता पतीचा खून, 20 वर्षांनी पुन्हा चर्चेत पूजा पाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल