TRENDING:

Double Voting Explainer: राहुल गांधींचा दावा उलटला, राजकीय कारकीर्द अडचणीत; कलम 337 लागू होणार, 7 वर्षांच्या तुरुंगवासाचा धोका

Last Updated:

Rahul Gandhi Double Voting Allegation: कर्नाटकमधील डबल मतदानाच्या प्रकरणावरून राहुल गांधींवर संकटाचे ढग दाटले आहेत. कलम 337 अंतर्गत कारवाई झाल्यास त्यांना तुरुंगवास आणि खासदारपद गमावण्याचा धोका आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कर्नाटकात डबल मतदानाचा दावा केल्याने काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राहुल गांधी यांनी एका प्रेसेंटेशनमध्ये कागदपत्र दाखवून दावा केला होता की, हे निवडणूक आयोगाचा रेकॉर्ड आहे आणि शगुन राणी नावाच्या महिलेकडे दोन मतदार ओळखपत्रे आहेत. त्यात मतदान केंद्रावरील अधिकाऱ्याचे टिक मार्क (✓) देखील आहे. जे हे सिद्ध करते की शगुन राणीने दोनदा मतदान केले आहे. आता हाच दावा त्यांच्या अडचणीचे कारण बनला आहे, कारण निवडणूक आयोग म्हणत आहे की, ही संपूर्ण गोष्ट उलटी आहे.
News18
News18
advertisement

कर्नाटकच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी राहुल गांधी यांना नोटीस जारी करून विचारले आहे की, तुम्ही केलेल्या दाव्याचे पुरावे द्या. कारण आम्ही केलेल्या तपासणीनुसार शगुन राणी नावाच्या महिलेने दोनदा मतदान केलेले नाही. पण सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, जर राहुल गांधींचा दावा चुकीचा आढळला तर काय होईल? त्यांच्यावर भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 337 अंतर्गत कारवाई होऊ शकते, असे म्हटले जात आहे.

advertisement

भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 337 काय आहे?

भारतीय न्याय संहिता (BNS) च्या कलम 337 चा वापर तेव्हा होतो, जेव्हा एखादी व्यक्ती सरकारी दस्तऐवज किंवा न्यायालयाच्या रेकॉर्डची बनावटगिरी करते. उदाहरणार्थ जर एखादी व्यक्ती मतदार ओळखपत्र, आधार कार्ड, जन्म-मृत्यू किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र, सरकारी प्रमाणपत्र, न्यायालयाच्या कार्यवाहीचे रेकॉर्ड किंवा पॉवर ऑफ अटॉर्नीसारख्या दस्तऐवजांमध्ये हेराफेरी करते, तर ती व्यक्ती या कायद्याच्या जाळ्यात अडकू शकते.

advertisement

राहुल गांधी यांनी ज्या प्रकारे निवडणूक आयोगाच्या दस्तऐवजाला चुकीच्या पद्धतीने सादर केले आणि त्यात छेडछाड केली ती या कलमाच्या कक्षेत येते, असे मानले जात आहे. जर हे सिद्ध झाले तर त्यांच्यावर कठोर कारवाई होऊ शकते.

कायदा काय म्हणतो?

कायदा सांगतो की जर एखादी व्यक्ती असे कोणतेही दस्तऐवज (कागदी असो किंवा इलेक्ट्रॉनिक) बनावट असल्याचे सिद्ध झाले. तर त्या व्यक्तीला 7 वर्षांपर्यंतच्या कठोर कारावासाची शिक्षा होऊ शकते. इतकेच नाही तर त्यांच्यावर अमर्यादित दंडही लावला जाऊ शकतो. कायद्याच्या तज्ज्ञांनुसार हा एक अजामीनपात्र (non-bailable) गुन्हा असू शकतो. म्हणजे दोषी आढळल्यास अटक झाल्यावर न्यायालयाकडूनच जामीन घ्यावा लागेल.

advertisement

शिक्षेची मुदत आणि परिणाम

जर आरोप सिद्ध झाले तर दोषी व्यक्तीच्या राजकीय कारकिर्दीवरही परिणाम होऊ शकतो. कारण लोकप्रतिनिधित्व कायदा, 1951 नुसार 2 वर्षे किंवा त्याहून अधिक शिक्षा झाल्यास संसद किंवा विधानसभेची सदस्यता रद्द होऊ शकते. राहुल गांधी यांच्या प्रकरणात, तपास आणि न्यायालयात त्यांनी मतदार यादीशी संबंधित कोणताही बनावट दस्तऐवज तयार केला किंवा वापरला हे सिद्ध झाल्यास कलम 337 अंतर्गत त्यांच्यावर खटला चालू शकतो. आणि दोषी आढळल्यास त्यांना 7 वर्षांपर्यंतचा तुरुंगवास, दंड आणि खासदार पद गमावण्याचा धोकाही आहे.

advertisement

नेमके पेच कुठे आहे?

न्यायालयात हे ठरवावे लागेल की हा दस्तऐवज जाणूनबुजून बनावट बनवला गेला होता की केवळ चुकीने समाविष्ट झाला होता. पुरावा सादर करण्याची जबाबदारी अभियोजन पक्षावर म्हणजेच निवडणूक आयोगावर असेल. दोष सिद्ध झाल्यास शिक्षा आणि दंडाची रक्कम न्यायालय ठरवेल.

काँग्रेसचे स्पष्टीकरण

कर्नाटक निवडणूक आयोगाच्या दाव्यावर काँग्रेसने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. काँग्रेसचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी म्हटले आहे की, राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केले आहेत आणि ते आरोप आयोगाच्या स्वतःच्या डेटावर म्हणजेच मतदार यादीवर आधारित आहेत. आता तुम्ही त्यांना रंगेहाथ पकडल्यानंतर त्यांच्याकडून दस्तऐवज मागत आहात? हा तोच डेटा आहे जो तुमच्याकडे आहे.

राहुल गांधींचा आरोप आहे की- आयोग डिजिटल, मशीन-रीडेबल मतदार याद्या देण्यास नकार देत आहे. सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्यास प्रतिबंध करत आहे आणि पुरावे मिटवत आहे. ते म्हणतात की, पुरावे सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध आहेत. तरीही आयोग 'व्हिसलब्लोअर'ला प्रश्न विचारत आहे. ही केवळ विडंबना नाही, तर स्वतःचा दोष स्वीकारल्यासारखे आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.

काँग्रेसने पाच थेट प्रश्न विचारले आहेत:

१. विरोधकांना डिजिटल मतदार यादी का दिली जात नाही?

२. सीसीटीव्ही आणि व्हिडिओ पुरावे मिटवण्याचे आदेश कोणी दिले?

३. बनावट मतदान आणि मतदार यादीत गडबड का झाली?

४. विरोधी नेत्यांना धमकावण्याचे कारण काय आहे?

५. निवडणूक आयोग आता भाजपचा निवडणूक प्रतिनिधी बनला आहे का?

मराठी बातम्या/Explainer/
Double Voting Explainer: राहुल गांधींचा दावा उलटला, राजकीय कारकीर्द अडचणीत; कलम 337 लागू होणार, 7 वर्षांच्या तुरुंगवासाचा धोका
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल