TRENDING:

मंदिर आहे की Time Travelचा दरवाजा? 3 हजार वर्ष जुन्या शिवलिंगाचे रहस्य, विज्ञानही गोंधळलंय!

Last Updated:

Neerputhoor Temple: केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील 3000 वर्षे जुने नीरपुथूर मंदिर हे अनेक रहस्यांनी भरलेले आहे. या मंदिरातील अनेक गोष्टी आज देखील संशोधक आणि वैज्ञानिकांसाठी कोड ठरल्या आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मलप्पुरम : भारतीय संस्कृती जगातील सर्वात प्राचीन संस्कृतींपैकी एक म्हणून ओळखली जाते. येथील प्राचीन संस्कृतीचा सर्वात मोठा पुरावा म्हणजे इथली मंदिरे. ही मंदिरे आजही आपल्या अद्वितीय रचनांमुळे जगभरातील लोकांसाठी आकर्षणाचे केंद्र बनलेली आहेत. या मंदिरांची बांधणी पाहून प्रत्येकजण आश्चर्यचकित होतो. याच श्रेणीतील एक रहस्यमय मंदिर म्हणजे नीरपुथूर मंदिर. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील पुथूर गावात सुमारे 3000 वर्षे जुने असलेले हे मंदिर अनेक रहस्यांनी भरलेले आहे. धक्कादायक म्हणजे इथे विज्ञानाचे सर्व सिद्धांत निष्प्रभ ठरतात. हे मंदिर आणि त्याचे गर्भगृह आजही संशोधक आणि वैज्ञानिकांसाठी एक न उलगडलेले कोडे बनले आहे.
News18
News18
advertisement

स्वयंभू शिवलिंगाचे रहस्य

या मंदिराचा सर्वात रहस्यमय भाग म्हणजे येथील शिवलिंग. या शिवलिंगाबद्दल अशी मान्यता आहे की, ते कोणत्याही मानवी प्रयत्नांशिवाय स्वतःहून प्रकट झाले आहे. विज्ञान जिथे प्रत्येक गोष्टीची उत्पत्ती आणि रूपाकडे विश्लेषणात्मक दृष्टीने पाहते. तिथे या शिवलिंगाची उपस्थिती वैज्ञानिकांना चकित करते. स्थानिक लोकांच्या मान्यतेनुसार, या शिवलिंगाचा कोणताही स्पष्ट निर्मिती काळ नाही. कोणतीही रचना प्रक्रिया नाही – हे केवळ श्रद्धा आणि विश्वासाशी जोडलेले रहस्य आहे.

advertisement

अखंड जलाचा रहस्यमय स्रोत

मंदिरात असलेल्या पाण्याचे रहस्यही तितकेच गूढ आहे. येथील शिवलिंगाच्या चारी बाजूंनी वर्षभर पाणी भरलेले असते. मग ते दुष्काळाचे दिवस असोत वा पावसाळ्याचे... पाण्याची ही सततची उपस्थिती भूगर्भशास्त्रज्ञांनाही विचार करायला लावते. हे पाणी नेमके कुठून येते, याचा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा अद्याप मिळालेला नाही.

या पाण्याला ‘चमत्कारी’ देखील मानले जाते. कारण भाविकांचा असा विश्वास आहे की यामध्ये रोग बरे करण्याची शक्ती आहे. यात काही खनिजे असू शकतात. जी आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील, असे मानले जाते. परंतु ज्या स्तरावर याला ‘औषधीय जल’ म्हटले जाते त्याचे वैज्ञानिक उत्तर अद्याप मिळाले नाही.

advertisement

अविश्वसनीय वास्तुकला

मंदिराची वास्तुकला स्वतःच एक रहस्य आहे. याची रचना वास्तुशास्त्र आणि खगोल विज्ञानाच्या अशा नियमांवर आधारित आहे. ज्यांना आजच्या आधुनिक उपकरणांनीही पूर्णपणे मोजणे शक्य नाही. गर्भगृहाची स्थिती, त्याचे तापमान आणि त्यात असलेली रहस्यमय ऊर्जा समजून घेण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण कोणताही ठोस निष्कर्ष निघाला नाही. स्थानिक लोकांच्या म्हणण्यानुसार अनेक वैज्ञानिक जेव्हा गर्भगृहात गेले. तेव्हा त्यांनी असामान्य ऊर्जा प्रवाहाचा अनुभव घेतला. ज्याला आजपर्यंत तांत्रिकदृष्ट्या सिद्ध करता आलेले नाही.

advertisement

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्व

इतिहासकारांच्या मते, हे मंदिर केवळ आध्यात्मिकच नव्हे. तर सांस्कृतिक दृष्ट्याही अत्यंत महत्त्वाचे आहे. याच्या कथा वेद आणि पुराणांशी जोडलेल्या आहेत आणि स्थानिक लोकांमध्ये याबद्दल खूप श्रद्धा आहे. येथील रहिवासी याला केवळ एक मंदिर मानत नाहीत, तर ‘चमत्कारांचे स्थान’ मानतात.

मराठी बातम्या/Explainer/
मंदिर आहे की Time Travelचा दरवाजा? 3 हजार वर्ष जुन्या शिवलिंगाचे रहस्य, विज्ञानही गोंधळलंय!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल