महुआ मोईत्रा यांचा हा दुसरा विवाह आहे. यापूर्वी त्यांनी डेन्मार्कमधील फाइनान्सर लार्स ब्रोरसन यांच्याशी विवाह केला होता. मात्र नंतर दोघांचा घटस्फोट झाला. तसेच त्या वकील जय अनंत देहदरई यांच्यासोबत तीन वर्षे नात्यात होत्या. पण त्या संबंधांत नंतर दुरावा निर्माण झाला. दरम्यान महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेत प्रश्न विचारण्यासाठी पैसे स्वीकारल्याचे आरोप झाले होते. ज्यामुळे त्यांची खासदारकीही गेली होती.
advertisement
पिनाकी मिश्रा यांची देखील ही दुसरी लग्नगाठ आहे. त्यांनी याआधी संगीता मिश्रा यांच्याशी विवाह केला होता.त्या देखील एक नामांकित वकील होत्या.मिश्रा यांनी दिल्लीच्या सेंट स्टीफन्स कॉलेजमधून शिक्षण घेतले असून, दिल्ली विद्यापीठाच्या लॉ फॅकल्टीमधून एलएलबी केलं आहे.
राजकीयदृष्ट्या प्रभावशाली असलेल्या मिश्रा यांनी 1996 साली पुरी लोकसभा मतदारसंघातून तत्कालीन केंद्रीय मंत्री बृज किशोर त्रिपाठी यांचा पराभव करून खळबळ उडवून दिली होती. ते अनेक वर्षे पुरीचे प्रतिनिधित्व करत होते. मात्र 2024 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव भाजपा उमेदवार संबित पात्रा यांनी केला.
पिनाकी मिश्रा यांचे अनेक व्यवसाय आहेत. त्यांनी हॉटेल, रिसॉर्ट्स आणि इतर अनेक कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. 2014 मध्ये ते देशातील सर्वात श्रीमंत खासदारांमध्ये गणले गेले होते. त्यावेळी त्यांची मालमत्ता सुमारे 140 कोटी रुपये होती. यात दिल्लीच्या गल्फ लिंक रोडवरील 47 कोटींचा बंगला आणि भुवनेश्वरमधील फॉरेस्ट पार्कमधील 10 कोटींचा बंगला समाविष्ट होता.
सध्या दोघांचे जर्मनीत फिरतानाचे फोटोही व्हायरल होत आहेत. मात्र त्यांनी या विवाहाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.