TRENDING:

Grave of Adolf Hitler: हिटलरवर कुठे झाले अंत्यसंस्कार? आज तिथे काय आहे? उत्तर कल्पनेच्या पलीकडचे!

Last Updated:

Hitler's Final Resting Place: जर्मनीचा हुकूमशहा हिटलरच्या निर्णयांनी लाखो लोकांचे प्राण गेले. पण तुम्हाला माहिती आहे का, हिटलरने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार कसे आणि कुठे झाले? ज्या ठिकाणी हिटलरवर अंत्यसंस्कार करण्यात आले आज तिथे काय आहे? या सर्व प्रश्वांची उत्तरे जाणून घ्या..

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
भारतात विशेषत: महाराष्ट्रात सध्या औरंगजेबच्या कबरीवरून मोठा राडा सुरू आहे. औरंगजेबची कबर हटवण्यावरून राज्यात राजकीय तणाव वाढला असताना नागपूरात हिंसाचार देखील झाला. औरंगजेब हा सर्वात वादग्रस्त मुघल शासक मानला जातो कारण त्याने बिगर-मुस्लिमांविरुद्ध जझिया कर लावला होता. इतक नाही तर त्याच्या राजवटीत मोठ्या प्रमाणात हिंदू मंदिरे उद्ध्वस्त करण्यात आली. औरंगजेबचा आणि मराठ्यांचा संघर्ष तर सर्वांना माहिती आहे.  जगातील क्रूर हुकुमशहा म्हणून ॲडॉल्फ हिटलरचा उल्लेख होतो. राज्यात औरंगजेबाच्या कबरीवरून इतका राडा सुरू आहे. पण तुम्ही कधी विचार केला आहे का हिटलरला कुठे दफन केले असेल किंवा त्याला कुठे जाळण्यात आले असेल? ते ठिकाण कुठे आहे आणि लोक त्या ठिकाणाला भेट देतात का?
News18
News18
advertisement

समाजाच्या प्रगतीसाठी योगदान देणारी व्यक्ती किंवा चांगल्या बदलांसाठी आयुष्य खर्च केलेल्या व्यक्तीचे निधन होते तेव्हा अशा व्यक्तीचे अंत्यसंस्कार जेथे होते त्याचे स्मारक करण्यात येते. अशा ठिकाणी एखादे उद्यान तयार केले जाते. तर काही लोकांची कामगिरी इतकी मोठी असते की सरकार त्यांच्या सन्मानार्थ सार्वजनिक सुट्ट्या ठेवते. या उलट जर व्यक्ती हिटलरसारखी असेल तर  तुमच्या मनात काय भावना येतील? जो लाखो ज्यूंच्या मृत्यूला जबाबदार होता. अशा व्यक्तीला ज्या ठिकाणी दफन केले असेल ते ठिकाण कसे असेल. जर्मन सरकारने 2006 पर्यंत हिटलरला कुठे दफन/ जाळण्यात आले होते याबद्दल कोणतीही माहिती दिली नव्हती. मग त्यांनी उघड केले की, हिटलरला बर्लिनमध्ये एका पार्किंगच्या जागी त्याला जाळण्यात आले होते.

advertisement

हिटलरचा मृत्यू कसा झाला?

1945 च्या सुरुवातीस जेव्हा जर्मनी दुसरे महायुद्ध हरत आहे असे वाटले तेव्हा, हिटलर आणि त्याचे विश्वासू नाझी नेते आणि त्यांच्या कुटुंबीयांचा एक गट बर्लिनमध्ये हवाई हल्ल्यापासून वाचण्यासाठी बंकरमध्ये भूमिगत झाले. हे बंकर फ्यूहररबंकर म्हणून ओळखले जाते, जे त्याचे मुख्यालयात होते. येथेच तो दुसऱ्या महायुद्धाच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत राहिला. याच ठिकाणी त्याने 29 एप्रिल रोजी इव्हा ब्राउनशी लग्न केले. त्यानंतर दोन दिवसात दोघांनी आत्महत्या केली. नंतर हिटलर आणि त्याची पत्नी यांना बंकरमधून बाहेर काढण्यात आले आणि त्यांचे मृतदेह जवळच्या बागेत जाळण्यात आले. हिटलरच्या मृत्यूनंतर सोव्हिएतने आसपासच्या इमारती जाळल्या. ज्या त्यावेळी नाझी मोहिमांचा भाग होत्या. परंतु ते बंकर नष्ट करू शकले नाहीत. बर्लिनची भिंत पडेपर्यंत हा परिसर ओसाड होता आणि सरकारला अनेक पुरावे मिळाले, त्यावरून त्यांना समजले की हे ठिकाण हिटलरचे शेवटच्या दिवसांमध्ये याच ठिकाणी राहिला होता.

advertisement

तीर्थक्षेत्र बनण्याची भीती

सरकारने बंकरचे काही भाग नष्ट करण्याचा प्रयत्न केला. बंकरच्या शोधाचा अर्थ असा होता की त्यांनी हिटलरच्या अंतिम विश्रांतीचे ठिकाण शोधले होते. जर्मन सरकारला भीती वाटत होती की, ही माहिती जाहीर केल्याने जगभरातील नव-नाझी हिटलरला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या ठिकाणी येतील. सर्वात वाईट गोष्ट म्हणजे ते त्या भागाचे तीर्थक्षेत्र बनवतील. नव-नाझी हिटलर नायक असल्यासारखे आठवण ठेवतील. त्याऐवजी जर्मन सरकारने या ठिकाणा बद्दल काहीच माहिती न देण्याचे ठरवले. दुसरे महायुद्ध संपल्यापासून या भागात कोणतीही इमारत बांधली गेली नसल्यामुळे सरकारने या भागाभोवती साधे दिसणारे कार्यालये, अपार्टमेंट आणि एक पार्किंग जागा बांधली, जेणेकरून ते शक्य तितके साधे आणि सामान्य दिसेल. असे केल्याने कोणालाही शंका आली नाही की, त्याच्या खाली लाखो लोकांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या व्यक्तीचे अंतिम विश्रांतीचे ठिकाण आहे.

advertisement

2006 मध्ये मृत्यूस्थळाला मान्यता

सरकारने 2006 पर्यंत हिटलरच्या अंतिम विश्रांतीच्या ठिकाणाबद्दल मौन बाळगले होते. जेव्हा जर्मन सरकारने याची घोषणा केली. पण ही कोणत्याही प्रकारची औपचारिकता नव्हती. जर्मनीमध्ये 2006 च्या फिफा विश्वचषकाच्या एक दिवस आधी बर्लिनच्या राज्य सरकारने हिटलरच्या मृत्यूस्थळाला मान्यता देण्याचा निर्णय घेतला. त्यांनी  हिटलरच्या मृत्यूच्या ठिकाणाची ओळख सांगणारी पाटी 'इन डेन मिनिस्टरगार्टन' आणि 'गर्ट्रूड-कोलमार्-स्ट्रैस' यांच्या चौकावर पार्किंगच्या ठिकाणी लावण्याचा पर्याय निवडला. या पाटीमध्ये त्या ठिकाणाची ऐतिहासिक पार्श्वभूमी तसेच अफवा दूर करण्यासाठी पुरेशी ठरेल अशी माहिती माहिती आणि बंकरचा नकाशा  होता.

advertisement

एका साध्या रस्त्यावर

युद्धानंतर जर्मनीला स्वतःला पुन्हा उभे करण्याची गरज होती. लाखो लोकांच्या मृत्यूला जबाबदार असल्याने आणि युद्धादरम्यान ज्या देशांचे नुकसान झाले होते, त्यांनी वेढलेले असल्याने, त्यांना हिटलरच्या कोणत्याही आठवणी पुसून टाकण्याची गरज होती. हिटलरचे समर्थक अजूनही आहेत हे माहीत असल्याने, त्यांना भीती वाटत होती की त्याचा भूतकाळ, स्मारके याचा जर्मनीला त्रास होऊ शकतो. जर्मनीमध्ये हिटलरचे तीर्थक्षेत्र असणे नाझी राजवटीत मारल्या गेलेल्या लोकांसाठी आणि त्यांच्या जिवंत कुटुंबातील सदस्यांसाठी अत्यंत त्रासदायक आहे.  सरकार हिटलरने केलेल्या कृत्यांचा उत्सव साजरा करत नाही. तसेच हा भाग साधा ठेवून ते हिटलरला नायक किंवा लोकप्रिय व्यक्ती बनवू इच्छित नाहीत.

आई-वडिलांची कबर काढली

दुसरीकडे 2012 मध्ये ऑस्ट्रियामध्ये ॲडॉल्फ हिटलरचे आई-वडील अलोइस आणि क्लारा यांच्या कबरीवरील दगड काढण्यात आले. जेणेकरून उजव्या विचारसरणीच्या लोकांनी ते तीर्थक्षेत्र म्हणून वापरणे थांबवता येईल. ही कबर लिंझ शहरापासून 10 किमी अंतरावर असलेल्या लिओनडिंगमध्ये आहे.

लिओनडिंगचे महापौर वॉल्टर ब्रूनर यांनी सांगितले की, कुटुंबातील एका वंशजाने हा निर्णय घेतला होता. ॲडॉल्फ हिटलरचा जन्म 100 किमी अंतरावर असलेल्या ब्रौनौजवळ झाला होता. त्याचे बालपण लिओनडिंगमध्ये घालवले होते. पाद्री कर्ट पीटरशॅचर म्हणाले, वेळ जसजसा निघून गेला, तसतसे कबरीची देखभाल करणे कठीण झाले. समर्थकांच्या सभांसाठी कबरीचा गैरवापर होत होता. कबरीमध्ये ठेवलेल्या अवशेषांचे काय झाले, हे समजू शकले नाही. आता त्या ठिकाणी पांढऱ्या गिट्टीचा चौक आणि एक झाड आहे.

मराठी बातम्या/Explainer/
Grave of Adolf Hitler: हिटलरवर कुठे झाले अंत्यसंस्कार? आज तिथे काय आहे? उत्तर कल्पनेच्या पलीकडचे!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल