मंगेश पाडगावकरांची ही कविता आणि त्याचा अर्थ प्रत्येकासाठी वेगळा असला तरी प्रत्यक्षात आपल्या सर्वांचे प्रेम सेमच असते. होय, हे आम्ही नाही आता विज्ञानाने सिद्ध केले आहे. सात फेब्रुवारीपासून जगभरात व्हॅलेंटाईन वीक सुरू झाला आहे. १४ फेब्रुवारी रोजी आपल्या प्रिय व्यक्ती सोबत व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो. मात्र दरवर्षी साजरा होणारा हा व्हॅलेंटाईन डे प्रेम, रोमँटिक भावना, उत्साह आणि कधी कधी एकटेपणाची जाणीव करून देतो. काही लोकांसाठी हा दिवस त्यांच्या प्रेमसंबंधाचा आढावा घेण्याचा असतो, तर काही जण अजूनही त्यांच्या "विशेष व्यक्तीची" वाट पाहत असतात.
advertisement
प्रेम ही हृदयाची गोष्ट मानली जात असली तरी संशोधकांनी प्रेम समजून घेण्यासाठी वैज्ञानिक चौकट तयार केली आहे. प्रेम म्हणजे नेमके आहे तरी काय? पहिल्या नजरेतील प्रेम म्हणजे काय भानगड ते जाणून घ्या...
हा तर 'केमिकल लोचा'
शास्त्रज्ञांच्या मते, प्रेम निर्माण होण्यामागे तीन महत्त्वाची केमिकल जबाबदार असतात:
नॉरेपिनेफ्रिन – प्रेमाची सुरुवातीची भावना निर्माण करून हृदयाची धडधड वाढवते आणि उत्साह निर्माण करते.
डोपामाइन – आनंद आणि उत्तेजना निर्माण करते, ज्यामुळे व्यक्ती समोरच्या व्यक्तीकडे अधिक आकर्षित होते.
फेनिलेथिलामाइन – मोहाची भावना वाढवून प्रेम अधिक तीव्र बनवते.
नॉरेपिनेफ्रिन, डोपामाइन आणि फेनिलेथिलामाइन मेंदूमध्ये प्रेमाच्या भावना सक्रिय करतात. नॉरेपिनेफ्रिन प्रेमाच्या सुरुवातीच्या भावनांना उत्तेजन देण्यात भूमिका बजावते. यामुळे अॅड्रेनालाईनचे उत्पादन होते, ज्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि तळहातांना घाम येणे अशी लक्षणे निर्माण होतात. त्यानंतर डोपामाइन तयार होते, ज्यामुळे आनंदाची भावना निर्माण होते. तिसरा टप्पा फेनिलेथिलामाइनच्या प्रकाशनासह येतो, ज्यामुळे मोहाची भावना निर्माण होते.
प्रेमाचे तीन टप्पे
शास्त्रज्ञांनी प्रेमाचे तीन टप्प्यांमध्ये वर्गीकरण केले आहे.
वासना (Lust) – पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि महिलांमध्ये इस्ट्रोजेन या हार्मोन्सच्या प्रभावाने आकर्षण निर्माण होते.
आकर्षण (Attraction) – या टप्प्यात डोपामाइनच्या प्रभावामुळे व्यक्ती समोरच्या व्यक्तीच्या प्रेमात पूर्णतः गुंतते.
आसक्ती (Attachment) – शेवटच्या टप्प्यात ऑक्सिटोसिन आणि व्हासोप्रेसिन या हार्मोन्सच्या प्रभावामुळे नातेसंबंध अधिक दृढ होतात.
प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञ डॉ. हेलेन फिशर यांच्या मते, ही प्रक्रिया केवळ माणसांमध्येच नाही तर इतर सस्तन प्राण्यांमध्येही दिसून येते. पहिला टप्पा म्हणजे वासना जी पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन आणि महिलांमध्ये इस्ट्रोजेनद्वारे नियंत्रित होतो. दुसरा आकर्षण आहे जी व्यसनाधीन व्यक्तीच्या पदार्थाच्या लालसेसारख्या भावना निर्माण करतो. आसक्ती अंतिम टप्प्यात होते. जिथे व्यक्ती खोलवर जोडल्या जातात आणि दीर्घकालीन योजना बनवतात.
जेव्हा एखादी व्यक्ती पहिल्यांदा प्रेमात पडते, तेव्हा तिच्या शरीरात काही विशिष्ट प्रतिक्रिया दिसून येतात:
अॅड्रेनालाईन- मुळे हृदयाची धडधड वाढते, चेहऱ्यावर लाली येते आणि तळहात घामट होतात.
नॉरेपिनेफ्रिन- मुळे जागरूकता वाढवते आणि प्रेमाची व्यसनाधीन भावना निर्माण करते.
डोपामाइन- मुळे जबरदस्त आनंद आणि सकारात्मक उर्जेचा अनुभव देते.
जरी हार्मोन्स प्रेमात पडण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात, तरी इतर घटकही प्रभाव टाकतात. फेरोमोन, म्हणजेच आपल्या घामातून निघणारे रसायने, आकर्षण वाढवतात. त्याशिवाय, सामायिक मूल्ये, श्रद्धा आणि शारीरिक वैशिष्ट्ये देखील प्रेम निर्माण होण्यास मदत करतात.
शुक्रवार ७ फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन वीक २०२५ सुरू झाला आहे. गुगलवर त्यासंबंधित सर्च देखील वाढत आहे. १४ फेब्रुवारी व्हॅलेंटाईन डे पर्यंत व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो.
७ फेब्रुवारी २०२५ (शुक्रवार) — रोझ दिवस
८ फेब्रुवारी २०२५ (शनिवार) — प्रपोज डे
९ फेब्रुवारी २०२५ (रविवार) — चॉकलेट डे
१० फेब्रुवारी २०२५ (सोमवार) — टेडी डे
११ फेब्रुवारी २०२५ (मंगळवार) — प्रॉमिस डे
१२ फेब्रुवारी २०२५ (बुधवार) — हग दिवस
१३ फेब्रुवारी २०२५ (गुरुवार) — किस डे
१४ फेब्रुवारी २०२५ (शुक्रवार) — व्हॅलेंटाईन डे