TRENDING:

प्रत्येक वर्षी भारतीय क्रिकेटपटू Wimbledon स्पर्धा पाहण्यासाठी का जातात? सक्ती आहे की अजून काही संबंध, जाणून घ्या

Last Updated:

Wimbledon Cricket Connection: विंबल्डन ही केवळ टेनिस स्पर्धा नसून, ती एक परंपरा, शिस्त आणि खेळाप्रती प्रेम व्यक्त करणारा सोहळा आहे. या ऐतिहासिक स्पर्धेत भारतीय क्रिकेटपटूंनीही प्रेक्षक म्हणून वारंवार उपस्थिती लावून टेनिसप्रेम दाखवले आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
विंबल्डन टेनिस स्पर्धी ही सर्वात जुनी आणि सर्वात मानाची स्पर्धा मानली जाते. दरवर्षी जगभरातील मोठमोठ्या व्यक्ती ही स्पर्धा पाहण्यासाठी उपस्थित राहतात. ही स्पर्धा केवळ एक खेळ नाही, तर एक परंपरेचा उत्सव मानला जातो. विंबल्डनची खास ओळख म्हणजे पांढरे कपडे घातलेले खेळाडू, हिरवळ असलेले मैदान आणि प्रत्येक पॉइंटनंतर प्रेक्षकांची टाळ्यांची दाद. ही केवळ एक क्रीडा स्पर्धा नसून एक पारंपरिक सोहळा आहे.
News18
News18
advertisement

दरवर्षी जगभरातील मान्यवर व्यक्ती यात सहभागी होतात. यात भारतातील क्रिकेटपटूही मागे नाहीत. विंबल्डन जरी टेनिसची स्पर्धा असली, तरी येथे क्रिकेट विश्वातील अनेक मोठी नावं प्रेक्षक म्हणून हजर राहिली आहेत. धोनी असो की विराट, सचिन असो की द्रविड… हे सर्व कधी ना कधी विंबल्डनच्या प्रेक्षकांमध्ये दिसले आहेत. कोणी फेडररचा चाहता आहे, तर कोणी टेनिसमधील चतुराई आणि वातावरण अनुभवण्यासाठी येतो. क्रिकेटचं मैदान वेगळं असलं तरी खेळासाठी असलेलं प्रेम विंबल्डनमध्येही स्पष्ट दिसून येतं.

advertisement

महेंद्रसिंग धोनीला टेनिसबद्दल खास प्रेम आहे. 2018 मध्ये तो विंबल्डन पाहण्यासाठी गेला होता. त्यावेळी त्याचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाले होते. पांढऱ्या शर्ट आणि ब्लेझरमध्ये धोनी विंबल्डनच्या  स्टाईलमध्ये दिसला. सोबत पत्नी साक्षीही होती. धोनींने एकदा सांगितले होते की, वेळ मिळाला की तो टेनिस पाहतो. रांची येथील घरी धोनीने टेनिस कोर्टदेखील बनवले आहे.

advertisement

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे दोघे 2023 मध्ये विंबल्डनमध्ये गेले होते. सेंटर कोर्टवर प्रेक्षकमधील त्यांचे फोटो लगेच व्हायरल झाले. विराटने सांगितले होते की त्याला रोजर फेडरर आणि राफा नडाल दोघंही आवडतात. कोहली स्वतः फिटनेस आणि खेळाबाबत खूपच उत्कट मानले जातात.

सचिन तेंडुलकरचा आणि विंबल्डनचा जुना संबंध आहे. सचिन स्वतः फेडररला भेटायला गेला होता. दोघांचे फोटो अजूनही सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सचिनने एकदा म्हटले होते की- टेनिसमधील शिस्त मला खूप आवडते, म्हणून या खेळाशी जोडलेला राहतो.

advertisement

राहुल द्रविड सुद्धा या स्पर्धेचा मोठे चाहता आहे. एका मुलाखतीत राहुल द्रविडने सांगितले होते की तो लहानपणापासून विंबल्डन पाहतोय. टेनिस हा केवळ एक खेळ नाही, तर तो एक रणनीतिक कला आहे. टेनिस आणि क्रिकेट या दोन्ही खेळांत संयम, विचार आणि मानसिक ताकद यांची गरज असते.

भारताचे कर्णधार रोहित शर्मा 12 जुलै 2024 रोजी विंबल्डन टेनिस स्पर्धेतील पुरुष एकेरी उपांत्य फेरीच्या सामन्यात प्रेक्षकांमध्ये दिसला होता. हा सामना कार्लोस अल्कारेझ आणि डॅनियल मेदवेदेव यांच्यात झाला. रोहितसोबत क्रिकेटर दिनेश कार्तिक आणि फुटबॉलर लुका मॉड्रिकदेखील स्टेडियममध्ये उपस्थित होते.

advertisement

एवढे क्रिकेटपटू विंबल्डन टेनिस स्पर्धा पाहण्यासाठी का जातात?

त्याचे सर्वात सोपे उत्तर म्हणजे – खेळाबद्दल असलेला आदर. एक खरा खेळाडू फक्त आपल्या खेळाचा नाही, तर प्रत्येक खेळाचा सन्मान करतो. जेव्हा क्रिकेटपटू इतर खेळ पाहण्यासाठी येतात, तेव्हा ती खेळांमधील ऐक्य आणि परस्पर समज दर्शवते.

क्रिकेट आणि टेनिस हे दोन्ही खेळ ब्रिटीश परंपरेतून आले आहेत. दोन्ही खेळांमध्ये पांढऱ्या कपड्यांचा ड्रेसकोड, मैदानावरील शिस्त आणि एक विशिष्ट आदर आहे. विंबल्डनमधील पांढऱ्या पोशाखांची शालीनता आणि टेस्ट क्रिकेटची युनिफॉर्म यामध्ये साम्य आढळतं.

दोन्ही खेळांची मैदानेही गवताशी संबंधित आहेत. विंबल्डन पूर्णपणे गवतावर खेळला जातो. क्रिकेटलाही पूर्वी ‘लॉन स्पोर्ट’ म्हणून ओळखलं जात होतं. कदाचित म्हणूनच अनेक क्रिकेटपटूंना विंबल्डनची जमीन त्यांच्याच मैदानासारखी वाटते.

खेळांच्या जगात असं कमीच होतं की दोन भिन्न खेळ भावनिकदृष्ट्या जोडले जातात. पण जेव्हा विंबल्डनमध्ये कॅमेरा एखाद्या भारतीय क्रिकेटपटूकडे वळतो, तेव्हा स्पष्ट कळतं – खेळांची भिंत नसते, जिद्द मात्र सगळ्यांत सारखीच असते.

मराठी बातम्या/Explainer/
प्रत्येक वर्षी भारतीय क्रिकेटपटू Wimbledon स्पर्धा पाहण्यासाठी का जातात? सक्ती आहे की अजून काही संबंध, जाणून घ्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल