12 वीच्या मुलीचं टोकाचं पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, कल्याण शहरातील बारावीमध्ये शिकणाऱ्या 17 वर्षांच्या विद्यार्थिनीने नापास होण्याच्या भीतीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघड झाली आहे. ही घटना बुधवारी सकाळी कल्याण पूर्वेतील कोळसेवाडी परिसरात घडली.
संबंधित विद्यार्थिनी वाणिज्य शाखेत बारावीचे शिक्षण घेत होती. परीक्षेचे पेपर अपेक्षेप्रमाणे झाले नसल्यामुळे ती तणावाखाली होती. आपण परीक्षेत उत्तीर्ण होऊ शकणार नाही अशी भीती तिच्या मनात होती. याच नैराश्यातून तिने टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
advertisement
चिठ्ठीतून समोर आले धक्कादायक कारण
घटनास्थळी सापडलेल्या चिठ्ठीत तिने,''माझे पेपर चांगले गेले नाहीत. मी आई-वडिलांना त्रास द्यायचा नाही,''असे लिहिले आहे. या घटनेमुळे तिच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून आई-वडील मोठ्या मानसिक धक्क्यात आहेत.या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये वाढत चाललेला परीक्षा तणाव आणि मानसिक दबाव पुन्हा एकदा समोर आला आहे.
