TRENDING:

Shocking : लिफ्टमध्ये ट्रॉली ठेवली म्हणून 'असं' होईलं वाटलं नव्हतं; संपूर्ण कुटुंबासोबत घडलं असं काही की कल्याण हादरलं

Last Updated:

Kalyan Crime : कल्याणमधील एका परिसरात लिफ्टमध्ये कपडे आणि ट्रॉली ठेवण्यावरून वाद झाला. या वादातून तिघांनी एका व्यक्तीसह भयानक कांड केलेले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण : क्षुल्लक वादाचे रुपांतर अनेक वेळा अत्यंत भयंकर गुन्हेगारीत बदलते ते कधीच कळत नाही. यापूर्वीही अशा अनेक घटना समोर आलेल्या आहेत.त्यातच कल्याण शहरातून समोर आलेल्या घटनेने प्रत्येकजण हादरला आहेतय
Kalyan Crime News
Kalyan Crime News
advertisement

नेमकं घडलं काय?

कल्याण पूर्वेतील आडीवली ढोकळी परिसरात किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूपांतर धक्कादायक घटनेत झाले. लिफ्टमध्ये कपडे आणि ट्रॉली का ठेवली यावरून हा वाद सुरू झाला. या प्रकरणात मिथिलेशकुमार जलेश्वर राम यांना मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे.

लिफ्टमधील ट्रॉली ठरली वादाचं मूळ

मिळालेल्या माहितीनुसार, इमारतीच्या लिफ्टमध्ये कपडे आणि ट्रॉली ठेवण्यावरून आशिष, प्रिन्स आणि लॉजी या तिघांनी मिथिलेशकुमार यांच्याशी वाद घातला. वाद वाढत जाऊन त्यांनी मिथिलेशकुमार यांना मारहाण केली. ही मारहाण थांबवण्यासाठी त्यांचा भाऊ ओमप्रकाश आणि मेहूणा छोटकुमार यांनी हस्तक्षेप केला. मात्र त्यांनाही आरोपींकडून मारहाण करण्यात आली.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शेतकऱ्याचा प्रयोग भारी, अर्ध्या एकरमध्ये केली आंतरपीक शेती, 2 लाख उत्पन्न
सर्व पहा

या घटनेत मिथिलेशकुमार, ओमप्रकाश आणि छोटकुमार हे तिघे जखमी झाले. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे. इमारतीत लहान कारणांवरून होणारे वाद गंभीर स्वरूप धारण करत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण आहे.

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
Shocking : लिफ्टमध्ये ट्रॉली ठेवली म्हणून 'असं' होईलं वाटलं नव्हतं; संपूर्ण कुटुंबासोबत घडलं असं काही की कल्याण हादरलं
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल