TRENDING:

KDMC: कल्याण डोंबिवलीत पोटनिवडणूक होणार? 28 दिवस गायब झालेले ठाकरे गटाचे नगरसेवक आता कुणाचे?

Last Updated:

कल्याण डोंबिवली महापालिकमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक बेपत्ता झाल्यामुळे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. मागील अनेक दिवसांपासून

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
कल्याण :  कल्याण डोंबिवली पालिका निवडणूक यंदा गाजली ती बिनविरोध आणि बेपत्ता नगरसेवकांमुळे. मागील २८ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या ठाकरे गटाचे ३ नगरसेवक अखेरीस महापौरपदाची निवड झाल्यानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये परतले आहे. या तिन्ही नगरसेवकांनी परत येऊन नगरसेवकांची नोंदणी केली आहे.  पण, हे तिन्ही नगरसेवक कोणत्या गटात आहे हे मात्र अजूनही गुलदस्त्यात आहे.
News18
News18
advertisement

कल्याण डोंबिवली महापालिकमध्ये ठाकरे गटाचे नगरसेवक बेपत्ता झाल्यामुळे प्रकरण चांगलंच गाजलं होतं. मागील अनेक दिवसांपासून ठाकरे गटाकडून या नगरसेवकांचा शोध सुरू होता. पण, अखेरीस  २८ दिवसानंतर ठाकरे गटाचे तिन्ही नगरसेवक अचानक परतले.  ठाकरे गटाच्या तीन नॉट रिचेबल नगरसेवक आले आणि पहिले कोकण भवनात दाखल झाले. इथं आल्यावर तिघांनी नगरसेवकाची नोंदणी केली.

advertisement

राहुल कोट, स्वप्नाली केने आणि मधुर म्हात्रे अशी या तिन्ही बेपत्ता असलेल्या नगरसेवकांची नावं आहे. बेपत्ता झाल्यानंतर तिन्ही नगरसेवकांवर ठाकरे गटाने कारवाई केली होती. आता हे तिघे नगरसेवक ठाकरे गटात नाहीत. त्यामुळे केडीएमसीमध्ये आत्ता ठाकरे गटाची नगरसेवक संख्या ८ वर पोहोचली आहे. ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर एकूण ११ जण निवडून आले होते. पण, त्यात महापौरपदाची निवड होण्याआधी राहुल कोट, स्वप्नाली केने आणि मधुर म्हात्रे नगरसेवक बेपत्ता झाले होते. आता तिन्ही नगरसेवकांनी नोंदणी केली आहे त्यामुळे ठाकरे गटाचे तीन नगरसेवक नक्की कोणत्या गटात आहे अद्याप अस्पष्ट झालं नाही. शिवसेना ठाकरे गट या तिघांविषयी काय भूमिका घेते हे पाहण्याचं ठरणार आहे.

advertisement

३ ननगरसेवक पक्षासोबत दिसले नाही तर अपात्रतेची कारवाई होणार

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
APMC Market: डाळिंबानं मार्केट खाल्लं, आले अन् केळीला कुठं मिळाला सर्वाधिक भाव?
सर्व पहा

दरम्यान,  केडीएमसीतील निवडून आलेल्या ११ पैकी ८ नगरसेवकांनी गट स्थापन केला आहे. मात्र शिवसेना ठाकरे गटाचे नाट रिजेबल तीनही नगरसेवक आज कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणीसाठी गेले. त्यांनी त्यांच्या सदस्यपदाची नोंदणी केली आहे. मात्र ठाकरे गटाने स्थापन केलेल्या गटात सहभागी झाले नाहीत. येत्या महासभेत हे तिन्ही नगरसेवक पक्षासोबत दिसले नाही तर त्यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई केली जाईल, अशा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख शरद पाटील यांनी दिला आहे. तर या तिन्ही नगरसेवकांच्या प्रभागात पोट निवडणुकीची तयारी सुरू झाली आहे. इच्छुक देखील कामाला लागले आहे असे सूचक विधान शिवसेना ठाकरे गटा गटनेते उमेश बोरगांवकर यांनी केलं.

advertisement

मराठी बातम्या/Kalyan Dombivli/
KDMC: कल्याण डोंबिवलीत पोटनिवडणूक होणार? 28 दिवस गायब झालेले ठाकरे गटाचे नगरसेवक आता कुणाचे?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल