काय आहे नवा बदल?
कोकणकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासा देत कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांमध्ये अतिरिक्त डबा जोडण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार या दोन्ही गाड्यांमध्ये 3-टियर एसी इकॉनॉमीचा एक अतिरिक्त डबा कायमस्वरूपी समाविष्ट केला जाणार आहे.
बदललेल्या रचनेनुसार प्रत्येक गाडीत एक फर्स्ट एसीसह एसी-2 श्रेणी, एक एसी-2 श्रेणी, चार एसी-3 श्रेणी, तीन एसी-3 श्रेणी इकॉनॉमी, सात शयनयान, चार सामान्य द्वितीय श्रेणी, एक पॅन्ट्री कार, एक जनरेटर कार आणि एक गार्ड ब्रेक व्हॅन असे एकूण 23 एलएचबी डबे असतील.
advertisement
नवे वेळापत्रक जाणून घ्या
ट्रेन क्रमांक 20111 सीएसएमटी-मडगाव कोकणकन्या एक्सप्रेस 25 फेब्रुवारीपासून तर 20112 मडगाव-सीएसएमटी ही गाडी 24 फेब्रुवारीपासून नव्या रचनेनुसार धावेल. तसेच 10103/10104 मांडवी एक्सप्रेसही 25 फेब्रुवारीपासून अतिरिक्त डब्यासह सेवेत दाखल होणार आहे.
या बदलामुळे गाड्यांची आसनक्षमता वाढणार आहे. सुट्ट्या, सणासुदीचा काळ आणि लग्नसराईच्या हंगामात कोकणकडे जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात असते. अतिरिक्त डब्यामुळे आरक्षणाची उपलब्धता वाढेल आणि प्रवाशांची गैरसोय काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा आहे.
