जाणून घेऊयात सोशल मीडियावर वायरल होत असलेला हा 30-30-30 डाएट प्लॅन नेमका आहे तरी काय ?
तुम्ही वजन कमी करण्यासाठी खरंच जागरूक असाल तर तुम्हाला सकाळी लवकर उठून या 30-30-30 डाएट प्लॅन किंवा 30-30-30 या नियमांवर काम करावं लागेल. सकाळी उठल्याच्या 30 मिनिटांच्या आत तुम्हाला प्रोटीनयुक्त नाश्ता करावा लागेल. नाश्त्यामध्ये तुम्ही अंडी खाऊ शकता किंवा ओट्स,क्विनोआ, चिया सीडस् खाऊ किंवा अन्य प्रोटिनयुक्त पदार्थांचा नाश्त्यात समावेश करू शकता. नाश्त्याच्या 30 मिनिटांच्या आत तुम्हाला 30 मिनिटांसाठी व्यायामाला सुरूवात करावी लागेल. आपल्या घरातील ज्येष्ठ सदस्य नेहमी म्हणतात की ,जेवणानंतर लगेच व्यायाम करायचा नसतो मग इथे खाल्ल्या-खाल्ल्या लगेच कसा व्यायाम करायचा ? असा प्रश्न पडू शकतो. तुम्ही जर नीट वाचलं असेल तर तुम्हाला 30 मिनिटांच्या आत व्यायाम सुरू करायचा आहे. मुख्य म्हणजे सुरूवातीला हलका व्यायाम करून मग तुम्ही व्यायामाची तीव्रता वाढवायची आहे. याशिवाय असंही म्हटलं जातं की, काही खाल्ल्यानंतर शतपावली घालावी. त्याच पद्धतीने नाश्ता केल्यानंतर जर तुम्ही 20 मिनिटांनी चालायला सुरूवात केली आणि त्यानंतर व्यायाम केला तर तुमच्या शरीराला होऊ फायदा शकतो.
advertisement
हे सुद्धा वाचा : Weight loss diet plan: वजन कमी करायचं आहे? मग फक्त व्यायामच नाही, घ्या ‘या’ गोष्टीची काळजी; अन्यथा सगळे प्रयत्न ठरतील फोल
30-30-30 प्लॅनमुळे वजन कमी होतं का?
आहारतज्ज्ञांचं असं मत आहे की, हा प्लॅन फॉलो करत अनेकांना फायदा झालाय त्यांचं वजन कमी झालंय. मात्र हे शास्त्रीयदृष्ठ्या सिद्ध झालेलं नाहीये. कारण आजपर्यंत याबाबतीत कोणतंही संशोधन झालेलं नाही. मात्र या डाएट प्लॅनचे काही फायदे नक्कीच आहेत. उदा. सकाळी प्रोटीनयुक्त नाश्ता केल्यास फायदा होता. कारण प्रोटीन्स पचायला जास्त वेळ लागतो. यामुळे पोट भरलेलं राहतं आणि भूक लागते. त्यामुळे अतिरिक्त खाणं टाळलं जातं ज्यामुळे वजन वाढण्याचा धोका टळतो.
वजन कमी होण्यासोबत गंभीर आजार होतात दूर
संशोधनातून असंही सिद्ध झालंय की, प्रथिनंयुक्त नाश्ता केल्याने रक्तातील साखर कमी होते. त्यामुळे डायबिटीस नियंत्रणात राहायाला मदत होते. याशिवाय रक्तदाब नियंत्रित राहायला मदत होते. त्यामुळे हृदयाचं आरोग्य सुधारतं. याशिवाय रक्तात असलेलं चांगलं कोलेस्टेरॉल वाढायला मदत होते. 30-30-30 डाएट प्लॅनमध्ये सांगितल्याप्रमाणे फक्त लवकर उठून नाश्ता करणं नाही तर व्यायाम करणं देखील महत्त्वाचं आहे. यामुळे जास्त कॅलरीज बर्न होऊन वजन कमी व्हायला मदत होईल. याशिवाय वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप आणि तुम्ही तणावमुक्त असणं सुद्धा महत्त्वाचं आहे.