Weight loss diet plan: वजन कमी करायचं आहे? मग फक्त व्यायामच नाही, घ्या ‘या’ गोष्टीची काळजी; अन्यथा सगळे प्रयत्न ठरतील फोल

Last Updated:
प्रतिकात्मक फोटो : वजन कमी करायचं आहे? मग घ्या ‘या’ गोष्टीची काळजी
प्रतिकात्मक फोटो : वजन कमी करायचं आहे? मग घ्या ‘या’ गोष्टीची काळजी
मुंबई :  वाढतं वजन हे अनेकांसाठी डोकेदुखीचं कारण ठरलं आहे. वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकार आणि उपाय अवलंबवून सुद्धा ते कमी होत नाही. वजन कमी करण्यासाठी अनेक जण तासंतास जीममध्ये व्यायाम करतात. काही जण उपाशी राहातात, तर काही दिवसातून फक्त एकदाच जेवतात. मात्र असं करूनही त्यांचं वजन कमी होत नाही. याची 2 मुख्य कारणं मानली जातात. एक तर अनावश्यक चिंता आणि दुसरं म्हणजे चुकीच्या वेळी खाणं. चुकीच्या वेळी जेवल्यामुळे वजन कमी होत नाही. त्यामुळे तुम्हाला जर खरंच वजन कमी करायचं असेल तर तुम्हाला तुमच्या जेवणाच्या वेळा या पाळाव्याच लागतील. खाण्याच्या सवयींवर नियंत्रण आलं तर वजन लवकर कमी व्हायला मदत होते. आहारतज्ज्ञांच्या मते, लठ्ठपणा किंवा वाढलेलं वजन कमी करायचं असेल तर नाश्ता, दुपारचं जेवण आणि रात्रीचं जेवण ठराविक आणि योग्य वेळी केलं पाहिजे.
जाणून घेऊयात जेवणाच्या योग्य वेळा कोणत्या ?

न्याहरी:

आहारतज्ज्ञांच्या मते, जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल तर सकाळी योग्य वेळी नाश्ता हा करायलाच हवा. सकाळी उठल्यानंतर 1 तासाच्या आत नाश्ता केल्याने चयापचय क्रिया सुधारून अन्न पचायला मदत होते. शिवाय शरीराला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा मिळते. मात्र तुम्ही जर सकाळी नाश्ता केला नाही तर तुमचं वजन वाढू शकतं. न्याहरीमध्ये अंडी, दही, ओट्स, कडधान्य किंवा फळं  खाणं हा तुमच्यासाठी पूरक नाश्ता ठरू शकतो.
advertisement

दुपारचं जेवण :

सकाळच्या नाश्त्यानंतर साधारणपणे 5 ते 6 तासांनी दुपारचं जेवणं करणं योग्य ठरतं. त्यामुळे तुम्ही सकाळी जर 8 च्या दरम्यान नाश्ता केला असेल तर 12.30 ते 1.30 च्या दरम्यान जेवण करणं योग्य ठरतं. दुपारच्या जेवणामुळे शरीराला आवश्यक ती ऊर्जा मिळते. याशिवाय चयापचय संतुलित  राहायला मदत होते. बऱ्याच संशोधनातून असं दिसून आलंय की, दुपारचं जेवण लवकर केल्याने वजन कमी व्हायला मदत होते. कारण दुपारी उशीरा जेवण केल्याने चयापचय क्रिया मंदावते त्यामुळे खाल्लेलं अन्न न पचल्याने वजन वाढण्याची भीती असते.
advertisement

रात्रीचं जेवण :

तुमच्या झोपेच्या किमान 3 तास आधी रात्रीचं जेवण करणं गरजेचं आहे. जेणेकरून खाल्लेलं अन्न पचण्यास पुरेसा वेळ मिळेल. अनेकांना जेवल्यानंतर लगेच झोपायची सवय असते. मात्र असं करणं हे वजन वाढीला आमंत्रण ठरतं. रात्रीचं जेवण हलकं आणि पोषक असलं पाहिजे, ज्यामुळे खाल्लेलं अन्न सहज पचायला मदत होईल. कारण रात्री चयापचय क्रिया मंदावलेली असते. त्यामुळे रात्री कॅलरीज कमी बर्न होतात. त्यामुळे रात्रीच्या कमी आणि संतुलीत प्रमाणात घेणं हिताचं ठरतं. रात्री उशीरा जेवण्यापेक्षा फळं खाण्याच्या आणि दूध पिण्याचा सल्ला आहारतज्ज्ञ देतात.
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Weight loss diet plan: वजन कमी करायचं आहे? मग फक्त व्यायामच नाही, घ्या ‘या’ गोष्टीची काळजी; अन्यथा सगळे प्रयत्न ठरतील फोल
Next Article
advertisement
Shiv Sena Candidate List BMC Election: बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
बीएमसी निवडणुकीत एकनाथ शिंदेंचा मास्टरस्ट्रोक! ६० उमेदवार तयार, तिकीट कुणाला?
  • भाजपसोबत जागा वाटपाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ

  • शिंदे यांनी आपल्या ६० उमेदवारांना तयार राहण्याचे आदेश दिले आहेत.

  • एकनाथ शिंदे यांनी आपली ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.

View All
advertisement