advertisement

Bigg Boss Marathi 6 मध्ये नवा राडा! कुल बॉईज तापले; घरातील वातावरण पेटलं

Last Updated:

Bigg Boss Marathi 6 Roshan Bhajankar Omkar Raut Fight : बिग बॉस मराठी 6 च्या घरात आता नवा ड्रामा पाहायला मिळतो आहे. दोन सदस्य घरातील भांडणात म्हणावं तसं नव्हते. म्हणजे त्यांची भूमिका इतकी आक्रमक नव्हती. पण आता मात्र ते आक्रमक होताना दिसले.

News18
News18
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये पहिल्या दिवसापासूनच वाद पाहायला मिळत आहेत. पण या वादात काही मोजकेच चेहरे दिसतात त्यापैकी सगळ्यात जास्त म्हणजे अनुश्री माने, रुचिता जामदार ज्यांची भांडणं अगदी टोकाची असतात. पण आता मात्र बिग बॉसच्या घरात वेगळंच चित्र पाहायला मिळालं आहे. घरात नवा ड्रामा पाहायला मिळतो आहे. घरातील कुल बॉइज रोशन भजनकर आणि ओमकार राऊत आपसात भिडले आहेत.
बिग बॉस मराठी 6 च्या नव्या एपिसोडचा प्रोमो समोर आला आहे. ज्यात रोशन भजनकर आणि ओमकार राऊत भांडताना दिसले आहेत. हे दोन्ही सदस्य घरातील भांडणात म्हणावं तसं नव्हते. म्हणजे त्यांची भूमिका इतकी आक्रमक नव्हती. पण आता मात्र ते आक्रमक होताना दिसले.
advertisement
रोशन आणि ओमकारमधील नेमका वाद काय?
रोशन : रूल तोडायला तू घाबरला नाहीस
ओमकार : तूही रूल तोडलेस
रोशन : तू काय म्हणाला...
ओमकार : अरे मी सांगतोय ऐक
रोशन : अरे ऐकू म्हणजे
ओमकार : टाकू का?, असं विचारत रोशनला नॉमिनेशनमध्ये टाकायची धमकी देतो.
रोशन : टाक, तुझ्यात इतकी हिंमत नाही आहे.
advertisement
या वादादरम्यान रोशन आपलं शर्ट काढून खाली फेकतो. जो ओमकारच्या पायाखाली येतो. ओमकार ते उचलून रोशनकडे टाकतो. रोशनला ओमकारने शर्ट नीट हातात न देता फेकला म्हणून राग येतो, तो शर्ट पुन्हा जमिनीवर फेकतो आणि रोशनला नीट उचलून हातात द्यायला सांगतो. यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद होतो. ओमकार रोशनला ऐक असं म्हणतो आणि रोशन त्याला निकल म्हणतो.
advertisement
आता ओमकार आणि रोशन यांच्यात वाद नेमका कशामुळे झाला हे एपिसोडमध्येच पाहायला मिळेल. पण यामुळे आता घरात नवा ड्रामा पाहायला मिळणार हे मात्र नक्की.
advertisement
पहिल्या आठवड्यात कॅप्टन्सीच्या टास्कदरम्यान ओमकार विशालला भिडला होता. त्यानंतर दुसऱ्या आठवड्यात त्याचा गेमच दिसला नाही. यावरून तिसऱ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश देशमुखने त्याला झापलंही होतं. आता चौथ्या आठवड्यात भाऊच्या धक्क्याआधीच ओमकारचं रोशनसोबत वाजलं आहे, त्यामुळे आता भाऊच्या धक्क्यावर त्याच्याबाबत काय प्रतिक्रिया येते हेही महत्त्वाचं ठरणार आहे.
view comments
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 मध्ये नवा राडा! कुल बॉईज तापले; घरातील वातावरण पेटलं
Next Article
advertisement
BMC News: मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दंड!
मुंबईकरांच्या खिशातून ५५ कोटी कंत्राटदाराला मिळणार? राजकीय निर्णयाचा मोठा भुर्दं
  • महापालिकेची तिजोरी रिकामी होत असल्याचा आरोप विरोधकांकडून सुरू असताना

  • आणखी एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

  • पार्किंग कंत्राटदाराने मुंबई महापालिकेकडे तब्बल ५५ कोटींच्या नुकसान भरपाईची माग

View All
advertisement