Bigg Boss Marathi 6 : घरातील नियमांचे तीनतेरा, 'बिग बॉस' भडकले! या सदस्यांना घरातून हाकलणार, कोण आहेत ते?
- Published by:Priya Lad
Last Updated:
Bigg Boss Marathi 6 : घरातील सदस्य सतत नियम मोडत असल्याचं पाहिल्यानंतर बिग बॉसने मोठा निर्णय घेतला आहे. यावेळी एकापेक्षा जास्त सदस्यांना घराबाहेर काढलं जाणार असल्याचं बिग बॉसने जाहीर केलं आहे.
बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझन म्हणावा तसा काही चालत नाहीये. म्हणजे सतत भांडणं, नीट टास्कही खेळले जात नाही. सतत नियमांचं उल्लंघन. बिग बॉसने वारंवार समजावलं पण कुणीच ऐकलं नाही. पुन्हा जैसे थे परिस्थिती. त्यामुळे बिग बॉस आता मात्र भडकले आहेत. घरातील नियमांचे तीनतेरा करणाऱ्या सदस्यांना आता बिग बॉस घरातून हाकलून देणार आहे.
बिग बॉस मराठी 6 चा चौथा आठवड्याचा शेवट जवळ आला. आठवड्याचा शेवट म्हणजे एव्हिक्शन आलं. घरातील एक सदस्य घराबाहेर पडणार. पण या आठवड्यात मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. घरातील फक्त एक नाही तर एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जाणार आहेत.
advertisement
बिग बॉसच्या नव्या एपिसोडच्या प्रोमोमध्ये बिग बॉसने आपला हा मोठा निर्णय जाहीर केल्याचं दिसतं आहे. व्हिडीओत तुम्ही पाहू शकता घरातील सगळे सदस्य एकत्र बसले आहेत. बिग बॉस विचारतात की आज सकाळपासून कोणी कोणी नियम मोडले. यावेळी घरातील आताचा कॅप्टन असलेला सागर कारंडे सगळ्यांनीच मोडलेत असं सांगतो.
यानंतर बिग बॉस म्हणतात, "याआधी बिग बॉसने खूप संधी दिली आहे. आता बिग बॉस मोठा निर्णय घेत आहेत. आता एकापेक्षा जास्त सदस्य घराबाहेर जातील. शेवटचे काही तास उरलेत"
advertisement
advertisement
बिग बॉसचं हे वाक्य ऐकल्यानंतर घरातील सगळ्यांच्या चेहऱ्याचा रंगच उडतो. आता घरातून बाहेर काढणारे ते सदस्य कोण असणार आहेत? हे एपिसोडमध्येच पाहायला मिळेल.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 10:29 AM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bigg Boss Marathi 6 : घरातील नियमांचे तीनतेरा, 'बिग बॉस' भडकले! या सदस्यांना घरातून हाकलणार, कोण आहेत ते?









