पाकिस्तानच्या राजधानीत महाभयंकर स्फोट, नमाजाच्या वेळी आत्मघाती हल्ला; 31 ठार, 169हून अधिक जखमी; मशिदीत मृतदेहांचा खच
- Published by:Jaykrishna Nair
Last Updated:
Powerful Blast In Islamabad: इस्लामाबादमधील तरलाई इमाम बारगाह परिसरात झालेल्या स्फोटामुळे राजधानीत प्रचंड खळबळ उडाली आहे. घटनेनंतर संपूर्ण शहरात तात्पुरती आणीबाणी लागू करत सुरक्षा व्यवस्था कडेकोट करण्यात आली आहे.
इस्लामाबाद: पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये असलेल्या तरलाई इमाम बारगाह परिसरात झालेल्या स्फोटात 31 जण ठार तर 169 हून अधिक जण जखमी झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. हा स्फोट शहजाद टाउन भागातील इमाम बारगाहमध्ये झाल्याचं प्राथमिक माहितीतून समोर आलं आहे. परिस्थिती गंभीर असल्याने संपूर्ण इस्लामाबादमध्ये तात्पुरती आणीबाणी लागू करण्यात आली आहे. सुरक्षा यंत्रणांनी इमाम बारगाह आणि आसपासचा परिसर सील केला असून, कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
स्फोटाची माहिती मिळताच पोलिस आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली असून, रेस्क्यू ऑपरेशन युद्धपातळीवर सुरू करण्यात आलं आहे. जखमींना तात्काळ रुग्णालयात हलवण्याचं काम सुरू आहे.
Explosion near mosque in Pakistan; at least two killed, 6 injured
An explosion near a mosque in Azam Warsak, S. Waziristan has resulted in the death of 2 persons and 6 people, including the cleric of the mosque, Shazada Khan, who is a Jamiat-e-Ulema Islam affiliate, was injured. pic.twitter.com/QDesnOJBEX
— Aamaj News English (@aamajnews_EN) November 17, 2024
advertisement
परिस्थितीची गांभीर्य लक्षात घेता, इस्लामाबादमधील पॉलिक्लिनिक, पाकिस्तान इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस (PIMS) आणि CDA रुग्णालयात आणीबाणी लागू करण्यात आली आहे. PIMSच्या कार्यकारी संचालकांच्या आदेशानुसार रुग्णालयात आपत्कालीन व्यवस्था कार्यान्वित करण्यात आल्याची माहिती अधिकृत प्रवक्त्याने दिल्याचे वृत्त Dawnने दिले आहे. हा हल्ला उझबेकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष शौकत मिर्झियोयेव यांच्या दोन दिवसीय अधिकृत भेटीदरम्यान झाला आहे.
advertisement
❕In #Pakistan, an explosion occurred near a mosque, there were dead and injured pic.twitter.com/DjrIQ3Rk2d
— Oo ps (@ps_trump) September 29, 2023
मुख्य आपत्कालीन विभागासह ऑर्थोपेडिक, बर्न सेंटर आणि न्यूरोलॉजी विभाग पूर्णपणे सज्ज ठेवण्यात आले आहेत. स्फोटात जखमी झालेल्या रुग्णांना PIMS आणि पॉलिक्लिनिक रुग्णालयात दाखल केलं जात आहे.
advertisement
महत्त्वाचं म्हणजे, इस्लामाबादमध्ये ही घटना घडण्याआधीच अवघ्या तीन महिन्यांपूर्वी म्हणजेच 11 नोव्हेंबर 2025 रोजी G-11 परिसरातील जिल्हा व सत्र न्यायालयाबाहेर आत्मघाती स्फोट झाला होता. त्या घटनेत 12 जणांचा मृत्यू झाला होता, तर 30 हून अधिक लोक जखमी झाले होते.
सध्याची घटना अद्याप तपासाच्या टप्प्यात असून, अधिकृत यंत्रणांकडून माहिती घेतली जात आहे. परिस्थिती जसजशी स्पष्ट होईल, तसतशी अधिकृत अपडेट्स दिल्या जातील. प्राथमिक वृत्तांमध्ये बदल होण्याची शक्यता असल्याने, विश्वासार्ह स्रोतांच्या आधारेच माहिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 06, 2026 3:22 PM IST
मराठी बातम्या/विदेश/
पाकिस्तानच्या राजधानीत महाभयंकर स्फोट, नमाजाच्या वेळी आत्मघाती हल्ला; 31 ठार, 169हून अधिक जखमी; मशिदीत मृतदेहांचा खच





