Lifestyle: या वेळी खाणं आरोग्यासाठी ठरु शकतं घातक, वेळीच व्हा सावध!
- Published by:Sayali Zarad
- trending desk
Last Updated:
उत्तम आणि सुदृढ आरोग्यासाठी जेवणाच्या वेळा पाळण्याचं महत्त्व डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ वारंवार सांगत असतात. दिवसाची सुरुवात पोटभरीच्या नाश्त्यानं झाली पाहिजे, तशीच दिवसाची अखेरही सूर्यास्तापूर्वी हलक्या आहारानं व्हावी.
नवी दिल्ली: उत्तम आणि सुदृढ आरोग्यासाठी जेवणाच्या वेळा पाळण्याचं महत्त्व डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ वारंवार सांगत असतात. दिवसाची सुरुवात पोटभरीच्या नाश्त्यानं झाली पाहिजे, तशीच दिवसाची अखेरही सूर्यास्तापूर्वी हलक्या आहारानं व्हावी. ज्यांना रात्री उशिरा जेवण्याची सवय असते, त्यांना कोणते त्रास उद्भवू शकतात या संदर्भात .
उत्तम आरोग्यासाठी आहाराचं नियोजन खूप महत्त्वाचं असतं; पण हेच नियोजन बिघडलं तर आरोग्याच्या अनेक तक्रारी निर्माण होऊ शकतात. अनेक जण रात्री उशिरा जेवतता. ही सवय आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.
तुम्हाला रात्री उशिरा जेवण्याची सवय आहे का किंवा तुमच्या दिवसभराच्या व्यग्र वेळापत्रकामुळं तुमच्या जेवणाचं वेळापत्रकही कोलमडतं आणि तुम्ही रात्री उशिरा जेवता का? असं असेल तर वेळीच सावध व्हा. कारण, रात्री उशिरा जेवल्यानं शरीराच्या अनेक तक्रारी उद्भवतात आणि आपल्याला त्याचा त्रासही होतो.
advertisement
रात्री उशिरा जेवल्यामुळं जाडी वाढण्याची शक्यता असते. तसंच रक्तदाबाचा त्रासही होऊ शकतो. रात्री उशिरा जेवल्यामुळं कोणकोणते त्रास उद्भवू शकतात हे जाणून घेऊ या. मध्यरात्री उठून कधी भूक लागत असेल किंवा तुम्ही रात्री उशिरा जेवत असाल तर तुमच्या शरीराची जाडी वेगानं वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं डाएटिंग केल्याचा किंवा व्यायामाचा कोणताही परिणाम दिसून येणार नाही. वजन वाढतच राहतं. कारण रात्री उशिरा जेवल्यामुळं आपल्या शरीरातलं मेटाबॉलिझम मंदावत असतं.
advertisement
रात्री उशिरा जेवत असाल तर अन्नाचं योग्य पद्धतीनं पचन होत नाही. याचा आरोग्याला पुरेसा लाभ होऊ शकत नाही. पचनसंस्था बिघडते. त्यामुळं शरीरात वात, अपचन, पित्त यासारख्या समस्या वाढतात. त्यामुळं रात्री लवकर जेवावं असं सांगतात आणि त्यानंतर शतपावली अवश्य करावी. रात्री उशिरा जेवण झाल्यानंतर रक्तदाब सतत अस्थिर राहू शकतो. जेवण उशिरा झाल्यामुळं मधुमेह आणि कोलेस्टेरॉलचा त्रास सुरू होऊ शकतो. दररोज वेळेवर जेवावं. उशिरा जेवल्यामुळे हृदयाचं आरोग्य बिघडू शकतं आणि त्यामुळं काही आजारही उद्भवू शकतात. रात्री उशिरा जेवल्यास डोकं दुखणं, गॅस, पित्त, बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या निर्माण होऊ शकतात. कितीही पौष्टिक आहार घेतला तरीही आवश्यक पोषकतत्त्वं शरीराला मिळू शकत नाहीत आणि शरीरातली ऊर्जा कमी होण्याची शक्यता आसते. यामुळं थकवा आणि शरीरात सुस्ती वाढू शकते.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 21, 2024 6:51 AM IST