माणसांच्या त्वचेचा रंग वेगवेगळा का असतो? यामागे काय आहे कारण?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
प्रत्येक माणसाचा स्वभाव, रंग वेगवेगळ्या असतो. मात्र सर्वांचा रंग वेगळा का असतो? असा कधी प्रश्न तुम्हाला पडलाय का?
advertisement
advertisement
advertisement
भौगोलिक स्थितीतील फरकामुळे मानवी शरीरात बदल होत राहिले आणि त्यांचा रंग गोरा झाला. सूर्याची किरणे संपूर्ण पृथ्वीवर समान प्रमाणात पडत नाहीत. आफ्रिकेत, टांझानिया, केनिया आणि बोट्सवेनमध्ये जास्तीत जास्त सूर्यकिरण मिळतात. तर युरोप विषुववृत्तापासून लांब आहे आणि इथे दिवसांपेक्षा रात्री लांब आणि थंड असतात. येथे राहणाऱ्या लोकांच्या शरीरात मेलॅनिन कमी प्रमाणात तयार होते. या लोकांसाठी अतिनील किरणे फारशी हानिकारक नसतात, कारण या लोकांना जास्त सूर्यप्रकाश मिळत नाही.
advertisement
युरोपमध्ये राहणाऱ्या लोकांच्या शरीरात SLC24A5 आणि SLC45A2 नावाची प्रथिने विकसित झाली, त्यामुळे मेलेनिनचे प्रमाणही कमी झाले. अशाप्रकारे मानवाच्या स्थलांतराबरोबरच जनुकांमध्येही उत्परिवर्तन होत राहिले. सुमारे 15,000 वर्षांपूर्वी मानव अमेरिकेत गेला. आफ्रिका आणि अमेरिकेच्या तापमानात खूप फरक आहे. युरोपियन लोकांप्रमाणे, अमेरिकन लोकांना देखील मेलेनिनची फारशी गरज नसते आणि म्हणूनच त्यांच्या त्वचेचा रंग देखील कालांतराने अधिक गोरा झाला.
advertisement
advertisement
1978 मध्ये, अमेरिकेने एक उपग्रह प्रक्षेपित केला, जो टोटल ओझोन मॅपिंग स्पेक्ट्रोमीटरने सुसज्ज होता. या प्रकाशाद्वारे शास्त्रज्ञांना हे समजले की प्रकाश आणि उष्णतेसोबतच सूर्य अनेक प्रकारचे अल्ट्राव्हायोलेट किरण देखील उत्सर्जित करतो, जे मानवांसाठी हानिकारक आहेत. अतिनील किरणांच्या जास्त संपर्कामुळे त्वचेच्या कर्करोगासारखे आजारही होऊ शकतात.
advertisement