advertisement

प्रवाशांसाठी दिलासा! मध्य रेल्वेकडून चालवण्यात येणार 24 विशेष रेल्वे गाड्या, पाहा वेळापत्रक

Last Updated:

मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या मार्गांवर प्रवाशांची वाढती मागणी पाहता मध्य रेल्वेकडून एकूण 24 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत.

News18
News18
मुंबई : सणासुदीचा काळ, परीक्षा, लग्नसराई आणि वाढती प्रवासी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेने प्रवाशांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. मुंबई, पुणे, नागपूर, कोल्हापूर आणि सावंतवाडी रोड या महत्त्वाच्या मार्गांवर प्रवाशांची वाढती मागणी पाहता मध्य रेल्वेकडून एकूण 24 विशेष रेल्वे गाड्या चालवण्यात येणार आहेत. त्यामुळे या मार्गांवर प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना अतिरिक्त गाड्यांचा फायदा होणार असून, तिकीट उपलब्धतेची समस्या काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.
मध्य रेल्वेकडून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) – कोल्हापूर, CSMT – सावंतवाडी रोड, CSMT – नागपूर, लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) – नागपूर तसेच पुणे – नागपूर दरम्यान विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
advertisement
1) CSMT – कोल्हापूर – CSMT विशेष (6 सेवा)
1) ट्रेन क्र. 01029
दिनांक 13.02.2026, 18.02.2026 आणि 20.02.2026 रोजी CSMT येथून 14.30 वाजता सुटेल व कोल्हापूर येथे दुसऱ्या दिवशी 04.20 वाजता पोहोचेल.
2) ट्रेन क्र. 01030
दिनांक 14.02.2026, 19.02.2026 आणि 21.02.2026 रोजी कोल्हापूर येथून 15.55 वाजता सुटेल व CSMT येथे दुसऱ्या दिवशी 04.05 वाजता पोहोचेल.
advertisement
थांबे: दादर, ठाणे (फक्त 01030), कल्याण, लोणावळा, पुणे, जेजुरी, लोणंद, सातारा, कराड, किर्लोस्करवाडी, सांगली, मिरज.
2) CSMT – सावंतवाडी रोड – CSMT विशेष (6 सेवा)
1) ट्रेन क्र. 01129
दिनांक 14.02.2026, 19.02.2026 आणि 21.02.2026 रोजी CSMT येथून 00.20 वाजता सुटेल व सावंतवाडी रोड येथे 12.30 वाजता पोहोचेल.
2) ट्रेन क्र. 01130
त्याच दिवशी सावंतवाडी रोड येथून 17.20 वाजता सुटेल व CSMT येथे दुसऱ्या दिवशी 04.05 वाजता पोहोचेल.
advertisement
थांबे: दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ.
3) CSMT – नागपूर – CSMT सुपरफास्ट विशेष (2 सेवा)
1) ट्रेन क्र. 02139 – 19.02.2026 रोजी CSMT येथून 00.20 वाजता सुटेल, नागपूर येथे 15.30 वाजता पोहोचेल.
advertisement
2) ट्रेन क्र. 02140 – 17.02.2026 रोजी नागपूर येथून 20.00 वाजता सुटेल, CSMT येथे दुसऱ्या दिवशी 13.30 वाजता पोहोचेल.
4) LTT – नागपूर – LTT विशेष (4 सेवा)
1) ट्रेन क्र. 01021 – 14.02.2026 आणि 21.02.2026 रोजी LTT येथून 00.55 वाजता सुटेल.
2) ट्रेन क्र. 01022 – त्याच दिवशी नागपूर येथून 20.00 वाजता सुटेल.
advertisement
5) पुणे – नागपूर – पुणे सुपरफास्ट विशेष (6 सेवा)
1) ट्रेन क्र. 01467 – 13.02.2026 आणि 20.02.2026 रोजी पुण्याहून 15.50 वाजता सुटेल.
2) ट्रेन क्र. 01468 – 14.02.2026 आणि 21.02.2026 रोजी नागपूरहून 08.00 वाजता सुटेल.
3) ट्रेन क्र. 01419 – 18.02.2026 रोजी पुण्याहून 15.50 वाजता सुटेल.
4) ट्रेन क्र. 01420 – 19.02.2026 रोजी नागपूरहून 08.00 वाजता सुटेल.
advertisement
संरचना: 1 प्रथम वातानुकूलित, 1 वातानुकूलित द्वितीय, 2 वातानुकूलित तृतीय, 5 शयनयान, 6 सामान्य द्वितीय आणि 3 सामान्य द्वितीय श्रेणीसह गार्ड ब्रेक व्हॅन.
आरक्षणाची माहिती
ट्रेन क्रमांक 01029, 01030, 01129, 02139, 02140, 01021, 01022, 01467, 01468, 01419 आणि 01420 साठी आरक्षण सर्व पीआरएस स्थानकांवर तसेच www.irctc.co.in या संकेतस्थळावर खुले आहे.
अनारक्षित डब्यांसाठी UTS ॲपद्वारे तिकीट काढता येईल.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
प्रवाशांसाठी दिलासा! मध्य रेल्वेकडून चालवण्यात येणार 24 विशेष रेल्वे गाड्या, पाहा वेळापत्रक
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement