advertisement

Dahanu: काळ आला होता पण वेळ नाही! धावत्या लोकलमधून तरुण वैतरणा खाडीच्या पुलावरून खाली पडला, आणि...

Last Updated:

वैतरणा खाडीवरून जात असताना अचानक उद्यन वांगड याचा पाय घसरला आणि धावत्या लोकलमधून तो वैतरणा नदीच्या खाडीत पडला.

News18
News18
राहुल पाटील, प्रतिनिधी
डहाणू : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय आज पालघर जिल्ह्यातील डहाणू लोकल ट्रेनमध्ये आला आहे. धावत्या ट्रेनमधून एक करुण वैतरणा खाडीच्या पात्रात पडला. पण, सुदैवाने या तरुणाने खाडीत एका पिलरचा आधार घेतला, त्यामुळे त्याचा जीव वाचला. स्थानिक मच्छिमारांनी बोटीच्या मदतीने या तरुणाची खाडीतून सुखरूप सुटका केली.
मिळालेल्या माहितीनुसाार,  पश्चिम रेल्वेच्या उपनगरीय रेल्वे मार्गावर डहाणू आणि बोईसर रेल्वे स्थानकादरम्यान ही घटना घडली. उद्यन वांगड असं या तरुणाचं नाव आहे. उद्यन वांगड हाा बोईसर इथला रहिवासी आहे. कामाच्या निमित्ताने तो बाहेर गेला होता. रात्री रेल्वेनं प्रवास करत तो बोईसरला आपल्या घरी येत होता. ट्रेनच्या दारात उभं राहून उद्यन प्रवास करत होता.
advertisement
लोकल वैतरणा खाडीवरून जात असताना अचानक उद्यन वांगड याचा पाय घसरला आणि धावत्या लोकलमधून तो वैतरणा नदीच्या खाडीत पडला. अचानक एक तरुण लोकलमधून खाली पडल्याचं पाहून प्रवाशांनी आरडाओरडा केला. काही जणांनी चेन खेचून लोकल थांबवली. लोकलच्या मोटरमनने तातडीने घटनेची माहिती रेल्वे पोलिसांना दिली.
रेल्वे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळावरून पाहणी केली असता उद्यन वांगड हा जिवंत असल्याचं आढळून आलं. त्याने वैतरना नदीच्या खाडीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या एका पिलरला पकडून ठेवलं होतं. त्यामुळे पोलिसांनी स्थानिकांची मदत घेऊन तातडीने रेस्क्यू ऑपरेशन हाती घेतलं.
advertisement
वैतरणा खाडीपत्रात असलेल्या एका पिलरच्या बांधकामाचा उद्यनने आधार घेतला हे पाहून स्थानिकही हैराण झाले.  स्थानिकांनी ताातडीने बोट घेऊन घटनास्थळी धाव घेतली आणि उद्यन या तरुणाला सुखरूप बाहेर काढलं. या दुर्घटनेत खाडी पात्रात पडल्यामुळे उद्यन वांगड हा जखमी झाला आहे. त्याला तातडीने शासकीय रुग्णालयात उपचार करण्यासाठी दाखल करण्यात आलं.  धावत्या लोकलमधून खाडीत पडल्यानंतरही उद्यन सुखरूप असल्याचं पाहून स्थानिकांनी कौतुक केलं आहे. या मोहिमेत स्थानिकांनी तातडीने धाव घेतल्यामुळे पोलिसांनी सगळ्यांचं कौतुक केलं आहे.
view comments
मराठी बातम्या/ठाणे/
Dahanu: काळ आला होता पण वेळ नाही! धावत्या लोकलमधून तरुण वैतरणा खाडीच्या पुलावरून खाली पडला, आणि...
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement