Weather Alert: ठाण्यात वारं फिरलं, कल्याण डोंबिवलीला अलर्ट, शनिवारचं हवामान अपडेट
- Reported by:GEETA PANDHARINATH GAIKAR
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Weather Alert: ठाणे-मुंबईत गेल्या काही दिवसांत हवामानात मोठे बदल जाणवत आहेत. 6 फेब्रुवारीचं कल्याण-डोंबिवलीतील हवामान अपडेट जाणून घेऊ.
फेब्रुवारीच्या सुरुवातीलाच महाराष्ट्रात थंडीची तीव्रता कमी झाली असून, गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उत्तरेकडे कडाक्याची थंडी असली तरी राज्यातील काही भागात थंडी गायब झाल्याचे चित्र आहे. 7 फेब्रुवारी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील किमान तापमानात 2-3 अंशाने वाढ झाली असून, पहाटेच्या वेळी हलकी थंडी कायम राहील, तर दुपारी उष्णता जाणवेल. ठाणे जिल्ह्यासह कल्याण डोंबिवली परिसरातील हवामान अपडेट जाणून घेऊ.
advertisement
ठाणे जिल्ह्यात हवामान मुख्यत्वे स्वच्छ आणि सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 33-34 अंश सेल्सिअस आणि किमान तापमान 23 अंश सेल्सिअस असून, पुढील 5 दिवस कमाल तापमान स्थिर राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. दिवसभरात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता असून उन्हाळी हवामानाची सुरुवात असल्याने दुपारी उष्णता जाणवू शकते.
advertisement
फेब्रुवारीच्या सुरुवातीला कडक उन्हाळा सुरू होत असल्याने कल्याण-डोंबिवलीत हवामान अनेकदा चढउतार होऊन शनिवारी अंशतः ढगाळ ते मुख्यत्वे सूर्यप्रकाशित राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 36-38 अंश सेल्सिअस, तर किमान तापमान 20-21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे. दिवसा कडक ऊन आणि आकाशात अंशतः ढग दिसू शकतात.
advertisement
advertisement
बदलापूरमधील हवामान स्वच्छ आणि निरभ्र राहण्याची शक्यता आहे. कमाल तापमान 22 अंश सेल्सिअस किमान तापमान 36 अंश सेल्सिअस असेल. दिवसभर कडक ऊन असल्याने उकाडा जाणवेल. शहापूर आणि मुरबाड तालुक्यातील हवामान स्वच्छ आणि अंशतः ढगाळ असून, दिवसा ऊन राहील. कमाल तापमान 32-34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 19-20 अंश सेल्सिअस असेल. सातत्याने बदलणाऱ्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागेल.






