Spices for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी तुम्ही ‘हे’ करत आहात? आत्ताच थांबवा, अन्यथा होईल मोठं नुकसान

Last Updated:

Taking Empty spices for weight loss: वजन कमी करण्यासाठी रिकाम्यापोटी गरम मसाल्याचा वापर हा केला जात होता. मात्र यामुळे ॲसिडिटी, पोटदुखीच्या समस्यांमध्ये वाढ झाल्याचं दिसून आलंय. त्यामुळे तुम्ही सुद्धा वजन कमी करण्यासाठी रिकाम्यापोटी गरम मसाल्याचा वापर करत असाल तर तो आत्ताच थांबवा.

प्रतिकात्मक फोटो :  वजन कमी करण्यासाठी ‘ही’ चूक नको, आत्ताच थांबवा, होईल मोठं नुकसान
प्रतिकात्मक फोटो : वजन कमी करण्यासाठी ‘ही’ चूक नको, आत्ताच थांबवा, होईल मोठं नुकसान
मुंबई: स्वयंपाकघरात विविध पदार्थ बनवण्यासाठी आणि त्यांची चव वाढवण्यासाठी आपण मसाल्यांचा वापर करतो. स्वयंपाक घरातले अनेक मसाले हे आरोग्यदायी असून त्यांचे अनेक फायदे आहेत. काही मसाल्यांच्या वापर हा पचनासाठी आणि वजन कमी करण्यासाठी केला जातो. रिकाम्यापोटी या औषधी मसाल्यांचा वापर केल्यास त्याचे फायदे अधिक होतात. मात्र अनेकांना रिकाम्या पोटी गरम मसाले खाल्ल्याने त्रास झाल्याच्या समोर आलंय. त्यामुळे तुम्ही सुध्दा वजन कमी करण्यासाठी गरम मसाल्यांचा वापर करत असाल तर आधी ही बातमी वाचा.

उपाशीपोटी कोणते गरम मसाले आरोग्यासाठी घातक ठरू शकतात?

दालचिनी

अनेक आजारांवर दालचिनी गुणकारी आहे. मात्र दालचिनी ही गरम प्रवृत्तीची असल्याने सकाळी रिकाम्या पोटी दालचिनी गरम पाण्याक उकळवून प्यायल्याने त्रास होऊ शकते. दालचिनीमुळे घशात जळजळ आणि ॲसिडिटी होऊ शकते. शिवाय पोटदुखीच्या तक्रारीही वाढू शकतात.
advertisement

काळी मिरी

काळी मिरी ही पचनासाठी फायदेशीर आहे. मात्र ती रिकाम्या पोटी घेतल्यास घशाची आणि पोटाची जळजळ आणि ॲसिडिटीचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे रिकाम्यापोटी काळी मिरी खाल्ल्यामुळे फायद्याऐवजी नुकसानच होण्याची भीती अधिक आहे.

लवंग

लवंग ही अनेक आजारांवर गुणकारी आहे. सर्दी-खोकल्याच्या वेळी लवंग खाल्ली जाते किंवा ती गरम करून तिचा वास घेतला जातो. मात्र रिकाम्या पोटी लवंग खाल्ल्याने पोटदुखीचा त्रास होऊ शकतो.
advertisement

ओवा

ओवा हा उष्ण प्रकृतीचा आहे असून तो पचनासाठी फायद्याचा आहे. मात्र सतत रिकाम्या पोटी घेतल्याने ओवा घेतल्याने पोटात जळजळ वाढू शकते किंवा गॅसेसचा त्रास होऊ शकतो.

मेथी

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी मेथी फायद्याची आहे. परंतु रिकाम्या पोटी मेथी खाल्ल्यास जठराची जळजळ आणि पोटदुखीचा त्रास  होऊ शकते. ज्या व्यक्तींना दम्याचा त्रास आहे अशांनी तर रिकाम्यापोटी मेथी खाणं टाळावं कारण त्यांना श्वसनाचा त्रास होऊ शकतो. जर उपाशी पोटी मेथी खाण्याचं प्रमाण जास्त असेल अल्सरचा सुद्धा त्रास होऊ शकतो.
advertisement
तुम्ही जर वजन कमी करण्यासाठी रिकाम्या पोटी गरम मसाल्यांचा वापर करत असाल तो तर थांबवावा. गरम मसाल्याचा वापर योग्य पद्धतीने करण्यासाठी तुमच्या डॉक्टरांचा किंवा आयुर्वेदाचार्यांचा सल्ला घ्यावा.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Spices for Weight Loss: वजन कमी करण्यासाठी तुम्ही ‘हे’ करत आहात? आत्ताच थांबवा, अन्यथा होईल मोठं नुकसान
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement