घरगुती पद्धतीनं तयार केलेल्या मसाल्यांची करा या ठिकाणी खरेदी; वाढेल जेवणाची अधिक चव Video

Last Updated:

मसाले आणि गरम मसाल्यांशिवाय भारतीय जेवण हे पूर्णच होवू शकत नाही. डोंबिवलीतील जय महाराष्ट्र मसाले यांच्याकडे अनेक प्रकारचे मसाले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

+
News18

News18

लतिका तेजाळे, प्रतिनिधी
ठाणे : मसाले आणि गरम मसाल्यांशिवाय भारतीय जेवण हे पूर्णच होवू शकत नाही. महाराष्ट्रातही वेगवेगळ्या भागामध्ये वेगवगेळ्या प्रकारच्या मसाल्यांचा वापर करून जेवणाची चव वाढवण्यात येते. खरं तर प्रत्येक पदार्थाची चव ही त्यात वापरण्यात आलेल्या मसाल्यांवरच अवलंबून असते. त्यामुळे पदार्थ बनवण्यासाठी मसाल्यांची आवर्जून खरेदी केली जाते. ह्याच विशिष्ट मसाल्यांसाठी दाद द्यायला लागेल त्या मेहनती हातांना जे दिवस रात्र ग्राहकांच्या चवीचा विचार करून हे मसाले तयार करतात. महाराष्ट्रात असे अनेक उद्योजक आहेत ज्यांनी आपले पूर्ण आयुष्य हा व्यवसाय करण्यात व्यतीत केले. त्यांच्यापैकीच एक म्हणजे डोंबिवलीतील 74 वर्ष जुने असे जय महाराष्ट्र मसाले. जय महाराष्ट्र मसाले यांच्याकडे अनेक प्रकारचे मसाले विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 
advertisement
कधी झाली व्यवसायाची सुरुवात? 
1950 साली गायकवाड परिवारातील चंद्रभाऊ गायकवाड यांनी जय महाराष्ट्र मसालेची सुरुवात केली. कालांतराने चंद्रुभाऊ यांच्या मुलाने म्हणजेच तानाजी चंद्र गायकवाड यांनी 1970 साली सर्व सूत्र सांभाळले. याच व्यवसायात चुलत भावंडांनी देखील साथ दिली. 1990 मध्ये चंद्रभाऊ यांचे नातू या व्यवसायात आले आणि जय महाराष्ट्र मसाले राज्यभरात ठीक ठिकाणी पोहोचवण्यास सुरू केले. आजच्या तारखेला जय महाराष्ट्र मसाल्यांचे 16 ब्रांचेस आहेत. लालबाग, करी रोड, चिंचपोकळी, लोअर परेल, बालबा मस्जिद, वाशी एफएमसी मार्केट आणि डोंबिवली या ठिकाणी यांच्या विस्तृत शाखा आहेत. 
advertisement
2013 साली रामचंद्र तुकाराम गायकवाड यांनी डोंबिवलीतील आझदे गाव परिसरात मसाल्याचे दुकान सुरू केले. या ठिकाणी रामचंद्र आणि त्यांचा मुलगा रवी दोघे मिळून हा व्यवसाय करत आहेत. डोंबिवलीतील मोठ मोठ्या हॉटेल ना या ठिकाणाहून मसाले पुरवले जातात. येथे मालवणी, घाटी, आगरी, कोल्हापुरी मसाला तयार केला जातो. येथील स्पेशलिटी म्हणजेच स्पेशल मालवणी मसाला, एवन मॅजिक मालवणी मसाला या ठिकाणी अगदी घरगुती पद्धतीने सर्व प्रकारचे गरम मसाले भाजून त्यांना व्यवस्थित कुटून तयार केले जाते. स्वतःचे मॅन्युफॅक्चरिंग असल्यामुळे बाजारभावापेक्षा कमी किंमतीतीत इथे मसाले खरेदी करता येईल, अशी माहिती दुकानाचे मालक रामचंद्र गायकवाड यांनी दिली आहे.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/Food/
घरगुती पद्धतीनं तयार केलेल्या मसाल्यांची करा या ठिकाणी खरेदी; वाढेल जेवणाची अधिक चव Video
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement