advertisement

बॉलिवूडमध्ये भीतीचं सावट! रोहित शेट्टीच्या घरावर गोळीबार, 'या' कलाकारांसोबतही घडलेली भयानक घटना

Last Updated:
Firing at Rohit Shetty house: मुंबईतील जुहू सारख्या अतिशय हाय-प्रोफाईल भागात असलेल्या रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
1/10
ज्यांच्या चित्रपटांत गाड्या हवेत उडतात आणि अ‍ॅक्शनचा जबरदस्त तडका असतो, त्या रोहित शेट्टी यांच्या खऱ्या आयुष्यात आज पहाटे एका भीषण अ‍ॅक्शन सीनने खळबळ उडवून दिली आहे. मुंबईतील जुहू सारख्या अतिशय हाय-प्रोफाईल भागात असलेल्या रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर अज्ञातांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

2/10
सुदैवाने या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नसल्याची प्राथमिक माहिती आहे, मात्र या घटनेने संपूर्ण चित्रपटसृष्टीत भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

3/10
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी पहाटे ३ च्या सुमारास दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी रोहित शेट्टी यांच्या घराच्या दिशेने चार राऊंड फायरिंग केली. रात्रीच्या शांततेत गोळ्यांच्या आवाजाने संपूर्ण परिसर हादरून गेला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

4/10
सध्या रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून फॉरेन्सिक टीम पुराव्यांची तपासणी करत आहे. अद्याप कोणत्याही गँगने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही.

5/10
गेल्या काही महिन्यांपासून बॉलीवूड आणि ग्लॅमर विश्वातील प्रसिद्ध व्यक्तींवर गोळीबार होण्याचे सत्र सुरूच आहे. रोहित शेट्टी यांच्या आधी अनेक जण या दहशतीचे बळी ठरले आहेत.

6/10
२०२५ मध्ये कॅनडातील कपिलच्या कॅफेवर तब्बल तीन वेळा गोळीबार झाला. याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली होती. सप्टेंबर २०२५ मध्ये बरेली येथील दिशाच्या घरावर फायरिंग झाली. यातील हल्लेखोर पोलीस चकमकीत मारले गेले.

7/10
एप्रिल २०२४ मध्ये वांद्रे येथील 'गॅलेक्सी' अपार्टमेंटवर झालेला गोळीबार संपूर्ण देशाने पाहिला आहे. युट्यूबर एल्विश यादव आणि गायक ए. पी. ढिल्लों यांच्या घराबाहेरही २०२४-२५ दरम्यान गोळीबार करून दहशत माजवण्याचा प्रयत्न झाला होता.

8/10
जुहू परिसरात अनेक बड्या स्टार्सची घरं आहेत, अशा ठिकाणी गोळीबार होणं हे सुरक्षा यंत्रणेसमोर मोठं आव्हान आहे. हा हल्ला केवळ खंडणीसाठी होता की वैयक्तिक वादातून, याचा तपास पोलीस करत आहेत. सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे हल्लेखोरांचा माग काढला जात आहे.

9/10
१४ मार्च १९७४ रोजी मुंबईत जन्मलेले रोहित शेट्टी हे केवळ दिग्दर्शक नसून ते एक यशस्वी निर्माते आणि पटकथा लेखकही आहेत. त्यांचे वडील एम. बी. शेट्टी हे स्वतः बॉलिवूडचे मोठे स्टंट डायरेक्टर होते.

10/10
२००३ मध्ये 'जमीन' चित्रपटातून दिग्दर्शनात पाऊल ठेवणाऱ्या रोहित शेट्टींनी पुढे 'गोलमाल' आणि 'सिंघम' सारख्या ब्लॉकबस्टर फ्रँचायझी देऊन आपले वेगळे स्थान निर्माण केले. 'चेन्नई एक्स्प्रेस' सारख्या सुपरहिट चित्रपटासाठी त्यांना फिल्मफेअर नामांकनही मिळाले होते.

17 जागा अख्ख्या राज्याचं गणित फिरवणार, बंगालच्या सत्तेची चावी देणारा गेमचेंज फॅक्टर; हे मतदार ठरवणार नवा मुख्यमंत्री

  • एकच फॅक्टर! 277 जागांवर भारी

  • भूकंपाची केंद्रबिंदू ठरणाऱ्या 17 जागा

  • बंगालच्या राजकारणात खळबळ

View All
advertisement