राष्ट्रवादीचा नवा अध्यक्ष ठरला, भाजपच्या बड्या मंत्र्याने केला खुलासा
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
उपमुख्यमंत्रीपदानंतर पक्षाची सूत्र देखील सुनेत्रा पवारांकडे दिली जातील, अशी चर्चा सुरू असतानात राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे.
बुधवारी २८ जानेवारी रोजी बारामती विमानतळावर झालेल्या विमान अपघातात अजित पवार यांचं निधन झालं आहे. अजित पवारांच्या निधनानंतर त्यांच्या जागी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. त्यांना अजित पवारांकडे असलेली बहुतांशी खाती देण्यात आली आहेत. मात्र वित्त आणि नियोजन विभागाचं खातं अद्याप देण्यात आलं नाही.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा चेहरा देखील अद्याप ठरला नाही. पक्षाची सूत्र देखील सुनेत्रा पवारांकडे दिली जातील, अशी चर्चा सुरू असतानात राष्ट्रवादी काँग्रेसचा राष्ट्रीय अध्यक्ष ठरला असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याचं सांगण्यात येत आहे. याबाबतचा खुलासा भाजपच्या बड्या मंत्र्यानं केला आहे.
advertisement
भाजपचे केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी प्रफुल्ल पटेल यांनी निवड झाल्याचं सांगितलं आहे. त्यांनी एएनआयला दिलेल्या एका मुलाखतीत याबाबतचा खुलासा केला आहे. गोयल यांच्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली असून यावर टीका केली जात आहे.
पीयूष गोयल काय म्हणाले?
गोयल म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व आधी अजित पवारांकडे होते आणि आता सुनेत्रा पवारांकडे आहे. प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शरद पवार यांना राष्ट्रवादीत सामील होण्यासाठी आमंत्रित केले जाईल असे मला वाटत नाही, कारण त्यांनी जनतेचा विश्वास आणि मते गमावली आहेत, असंही गोयल म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 01, 2026 12:58 PM IST








