advertisement

बजेटमध्ये फक्त एक घोषणा आणि एका झटक्यात Share Market कोसळलं, या स्टॉक्सला मोठा फायदा

Last Updated:
निर्मला सीतारामन यांच्या बजेटमुळे STT वाढला, सेन्सेक्स 2300 आणि निफ्टी 800 अंकांनी कोसळले. BEL, HAL शेअर्स वाढले, PIO गुंतवणुकीस परवानगी मिळाली. ट्रेडर्समध्ये नाराजी.
1/7
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संपूर्ण बजेट मांडलं मात्र त्यामध्ये सर्वसामान्य लोकांना कोणताही दिलासा मिळाला नाही. तर याउलट ज्यांनी शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवले त्यांना तगडा दणका दिला आहे. शेअर्समध्ये पैसे लावणाऱ्यांनाच आता मोठा झटका लागणार आहे.

2/7
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज संसदेत बजेट मांडताना शेअर बाजारातील व्यवहारांवर लागणाऱ्या STT (Security Transaction Tax) मध्ये वाढ केली. या एका घोषणेने शेअर बाजारात भूकंप आला असून, सेन्सेक्स तब्बल 2300 अंकांनी कोसळला आहे, तर निफ्टी 800 अंकांनी घसरला आहे.

3/7
शेअर बाजारात 'फ्युचर्स अँड ऑप्शन्स' (F&O) मध्ये ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. सरकारने या व्यवहारांवरील STT ०.१ टक्क्यांवरून वाढवून ०.१५ टक्के केला आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर तुम्ही जेव्हा शेअर्सची खरेदी-विक्री करता, तेव्हा सरकारला द्यावा लागणारा 'व्यवहार कर' आता महागला आहे.

4/7
सलग दुसऱ्या बजेटमध्ये ही वाढ झाल्याने ट्रेडर्समध्ये नाराजी आहे आणि म्हणूनच बाजार जोरदार कोसळला.  बजेटच्या घोषणेनंतर वेदांता, हिंदुस्थान झिंक १०% , हिंदुस्थान कॉपर १८% आणि हिंडाल्को यांसारख्या मेटल शेअर्समध्ये मोठी पडझड झाली.

5/7
BSE आणि Groww सारख्या प्लॅटफॉर्मच्या शेअर्समध्येही हाहाकार उडाला. तर बाजारात घसरण असली तरी डिफेंस क्षेत्रातील शेअर्स मात्र जोरात धावत आहेत. BEL, माझगाव डॉक, कोचीन शिपयार्ड आणि HAL यांसारख्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये २ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.

6/7
बाजारात जरी सध्या भीतीचे वातावरण असले, तरी सरकारने एक दूरगामी निर्णय घेतला आहे. आता भारतीय मूळचे परदेशी नागरिक (PIO) थेट भारतीय शेअर बाजारात गुंतवणूक करू शकणार आहेत. यामुळे परदेशातून भारतात मोठ्या प्रमाणात पैसा येईल, अशी आशा आहे.

7/7
सध्या सेन्सेक्स ८०,५०० च्या खाली तर निफ्टी २४,८०० च्या खाली व्यवहार करत आहे. ऑटो, फार्मा आणि बँकिंग क्षेत्र वगळता इतर सर्वच क्षेत्रांत मोठी घसरण दिसत आहे. त्यामुळे शेअर मार्केटवरचा दबाव उद्या आणखी वाढणार आहे. बँक निफ्टी देखील जोरात आपटले आहेत.

युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement