advertisement

गॅस बिलाचे 1 हजार भरायला गेला मुंबईचा व्यावसायिक; पण एक क्लिक अन् मोठा गेम, ही चूक करू नका

Last Updated:

याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही फसवेगिरीचे प्रकार समोर येत असून, गॅस कनेक्शन तोडण्याच्या धमक्या देत नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना मुलुंडमध्ये उघडकीस आली आहे.

गॅस पेमेंट अपडेट नाही’ म्हणत पाठवली APK फाईल ; काही मिनिटांत खात्यातून लाखो रुपय
गॅस पेमेंट अपडेट नाही’ म्हणत पाठवली APK फाईल ; काही मिनिटांत खात्यातून लाखो रुपय
मुंबई : सध्या गॅसच्या टंचाईची भीती असल्यामुळे लोकांमध्ये गॅससंदर्भात मोठी चिंता निर्माण झाली आहे. गॅस मिळावा म्हणून नागरिक तासनतास रांगा लावत आहेत. याच परिस्थितीचा गैरफायदा घेत काही फसवेगिरीचे प्रकार समोर येत असून, गॅस कनेक्शन तोडण्याच्या धमक्या देत नागरिकांची आर्थिक लूट केली जात आहे. अशीच एक धक्कादायक घटना मुलुंडमध्ये उघडकीस आली आहे.
मुलुंड पश्चिम येथे राहणारे व्यावसायिक मितुल दोशी (वय 40) यांना 26 मार्च रोजी सकाळी मोबाईलवर एक संदेश आला. त्यामध्ये गॅस बिल न भरल्यास कनेक्शन तोडण्यात येईल, अशी सूचना देण्यात आली होती. त्यामुळे घाबरलेल्या दोशी यांनी तत्काळ गुगल पेद्वारे 1,150 रुपये भरले.
यानंतर सायंकाळच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून स्वतःला गॅस कंपनीचा प्रतिनिधी असल्याचे सांगितले. त्याने पेमेंटचा स्क्रीनशॉट मागितला. दोशी यांनी तो पाठवल्यानंतर पेमेंट अपडेट झालेले नाही असे सांगत त्या व्यक्तीने एक एपीके फाईल पाठवली आणि ती इन्स्टॉल करून त्यात माहिती भरण्यास सांगितले.
advertisement
दोशी यांनी दिलेल्या सूचनांप्रमाणे माहिती भरताच काही मिनिटांतच त्यांच्या आणि त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यांतून संशयास्पद व्यवहार सुरू झाले. पाहता पाहता त्यांच्या खात्यातून तब्बल 11.82 लाख रुपये विविध खात्यांमध्ये ट्रान्सफर करण्यात आले. घडलेला प्रकार लक्षात येताच दोशी यांनी तात्काळ बँकेशी संपर्क साधून दोन्ही खाती गोठवली. याप्रकरणी सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
advertisement
दरम्यान, अशा प्रकारच्या बनावट अॅप आणि फोन कॉलद्वारे होणाऱ्या फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे. कोणतीही एपीके फाईल डाउनलोड करू नये, तसेच वैयक्तिक आणि बँकिंग माहिती कोणालाही देऊ नये, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
गॅस बिलाचे 1 हजार भरायला गेला मुंबईचा व्यावसायिक; पण एक क्लिक अन् मोठा गेम, ही चूक करू नका
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement