Shocking Incident : भयंकर! प्रत्यक्ष तपासणी नाही, फक्त फोनवर 'हो-नाही' आणि स्टाफने सुरू ठेवले उपचार; 15 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू
Last Updated:
Nalasopara news : नालासोपारा पूर्वेत खासगी रुग्णालयातील हलगर्जीपणामुळे 15 वर्षीय मुलासोबत धक्कादायक प्रकार घडलेला आहे मृत्यू झाला. डॉक्टरांनी प्रत्यक्ष उपचार न करता फोनवरून सूचना दिल्याचा आरोप आहे.
नालासोपारा : रुग्णालयातील रुग्णाबाबत केलेली चूक एक कुटुंब उद्ध्वस्त करु शकते, असे एक प्रकरण नालासोपारा पूर्व परिसरातून समोर आले आहे. एका खासगी रुग्णालयातील निष्काळजीपणामुळे 15 वर्षांच्या मुलाचा दुर्देवी मृत्यू झालेला आहे. या प्रकरणामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे शिवाय या प्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात डॉक्टर आणि रुग्ण्यालयातील कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी तपास सुरु केलेला आहे.
फोनवर सुरू होते उपचार
मिळालेल्या माहितीनुसार, मुलाला उपचारासाठी नालासोपाऱ्यातील या खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले होते. पण, उपचारादरम्यान डॉक्टर स्वत: हा उपस्थित नव्हते. यात धक्कादायक गोष्ट म्हणजे डॉक्टरांनी या मुलाची प्रत्यक्ष तपासणी न करता फक्त फोन फोनवरुन सुचना दिल्या आणि या सूचनांनुसार रुग्णालयातील स्टाफने उपचार सुरु ठेवले.
रुग्णालयातील भोंगळ कारभार उघड
मुलावर उपचार करणार हा स्फाटही प्रशिक्षित नसल्याचे समोर आलेले आहे. स्टाफला आपल्याकडे उपचाराबाबत आवश्यक कौशल्य नसल्याचे माहिती असूनही त्यांनी ही जबाबदारी घेतली. मुलाच्या उपचारासाठी या योग्य वेळी तज्ञ डॉक्टरांना बोलवण्यात आले नाही,अशी ही तक्रार पोलिसांना करण्यात आली आहे.
advertisement
या उपचारामुळे मुलाची प्रकृती अधिक खालावली आणि शेवटी त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणानंतर मुलाच्या कुटुंबीयांनी संताप व्यक्त करत न्यायाची मागणी केली आहे. पोलिसांनी डॉक्टर आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला असून अधिकचा तपास सुरु केला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Mar 30, 2026 10:39 AM IST
मराठी बातम्या/ठाणे/
Shocking Incident : भयंकर! प्रत्यक्ष तपासणी नाही, फक्त फोनवर 'हो-नाही' आणि स्टाफने सुरू ठेवले उपचार; 15 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू








