advertisement

पुणे हादरलं! प्रवाशांनी भरलेली बस, तरी PMPML मध्येच वाहकाचं अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्य, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

Last Updated:

एक अल्पवयीन मुलगी कात्रज आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या शेख याने पीडितेचा मोबाईल नंबर मागून तिला त्रास देण्यास सुरुवात केली

अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्य (प्रतिकात्मक फोटो)
अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्य (प्रतिकात्मक फोटो)
पुणे: विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यात प्रवासादरम्यान महिला आणि मुली सुरक्षित आहेत का? असा गंभीर प्रश्न निर्माण करणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कात्रज ते स्वारगेट मार्गावर धावणाऱ्या पीएमपी बसमध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला. या प्रकरणी आता बस वाहकाला सहकारनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या धक्कादायक घटनेमुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण पसरले आहे.
प्रकरण काय?
आरिफ जलील शेख (वय ३५, रा. विश्रांतवाडी) असे अटक केलेल्या नराधम वाहकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २८ मार्च रोजी एक अल्पवयीन मुलगी कात्रज आगारातून स्वारगेटकडे जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होती. यावेळी कर्तव्यावर असलेल्या शेख याने पीडितेचा मोबाईल नंबर मागून तिला त्रास देण्यास सुरुवात केली. मुलीने नंबर देण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर, आरोपीने वाईट हेतूने तिला स्पर्श केला आणि अश्लील कृत्य करून विनयभंग केला.
advertisement
नराधम वाहकाच्या कृत्याने घाबरून न जाता मुलीने बसमध्येच आरडाओरडा केला. प्रवाशांच्या हे लक्षात येताच त्यांनी तातडीने शेखला पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सहकारनगर पोलिसांनी आरोपीविरुद्ध विनयभंग (IPC 354) आणि पोक्सो (POCSO) अंतर्गत गंभीर गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक जाधव या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
advertisement
सार्वजनिक बसमध्ये अशा घटना घडत असल्याने महिलांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची मागणी जोर धरत आहे. मात्र, पुण्यासारख्या शहरात आणि लोकांसमोरच वाहकाने केलेल्या या धक्कादायक कृत्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
view comments
मराठी बातम्या/पुणे/
पुणे हादरलं! प्रवाशांनी भरलेली बस, तरी PMPML मध्येच वाहकाचं अल्पवयीन मुलीसोबत नको ते कृत्य, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
Next Article
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले; 'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
युद्धात अमेरिकेची गुप्त माहिती फुटली, इराणला मदत करणाऱ्याचे नाव समोर आले;'सॅटेलाईट'चा तो 'डर्टी गेम' कोणी केला?
  • या देशाने इराणला 'टार्गेट' सेट करून दिलं

  • कोणी पुरवली अमेरिकन तळाची गुप्त माहिती

  • सॅटेलाईटचा 'डर्टी गेम' उघड

View All
advertisement