advertisement

फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंग म्हणजे काय? कसे होतात व्यवहार; सरकारने वाढवला टॅक्स, घोषणा होताच बाजार कोसळला

Last Updated:

Tax On Futures And Options Trading: केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये आयकर स्लॅब्समध्ये कोणताही बदल न करता सरकारने F&O ट्रेडिंगवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स 0.05 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

Rapid Read
Translate
News18
News18
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थसंकल्प 2026 मध्ये अर्थमंत्री निर्मला सीतारामन आयकरासंदर्भात काही महत्त्वाच्या घोषणा केल्या. या वेळी आयकर आयकर स्लॅब्समध्ये कोणताही बदल करण्यात आले नाही. निर्मला सीतारामन रविवारी फ्युचर्स अँड ऑप्शन्स (F&O) ट्रेडिंगवरील सिक्युरिटीज ट्रान्झॅक्शन टॅक्स (STT) 0.05 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा प्रस्ताव मांडला आहे. या घोषणेचा परिणाम शेअर बाजारावर झाला.
फ्युचर्स अँड ऑप्शन्स काय असते आणि हे व्यवहार कसे होतात
शेअर बाजारात आपण बहुतांश वेळा “आज शेअर घेतला, उद्या विकला” असा सरळ व्यवहार पाहतो. पण बाजार फक्त इतकाच सोपा नसतो. इथे भविष्यात काय होईल याचा अंदाज घेऊन आजच व्यवहार करणारे अनेक खेळाडू असतात. याच जगात Futures आणि Options Trading ही संकल्पना येते. ही केवळ गुंतवणूक पद्धत नाही, तर बाजाराच्या भविष्यातील हालचालींवर आधारित एक स्वतंत्र कथा आहे.
advertisement
समजा एखादा व्यापारी आहे. त्याला वाटते की पुढच्या महिन्यात गव्हाचे दर वाढणार आहेत. आजच जर त्याने गहू खरेदी केला, तर साठवण, वाहतूक याचा खर्च वाढेल. म्हणून तो आजच एक करार करतो, “मी पुढच्या महिन्यात अमुक दराने गहू घेईन.” हा करार म्हणजे Future Contract. हाच विचार शेअर बाजारात Futures Trading च्या रूपात वापरला जातो.
advertisement
Futures Trading म्हणजे काय?
Futures Trading म्हणजे भविष्यात ठराविक तारखेला, ठराविक किमतीला एखादा शेअर किंवा निर्देशांक खरेदी किंवा विक्री करण्याचा करार. इथे “हक्क” नाही, तर बंधनकारक जबाबदारी असते. म्हणजेच करार केला की तो पूर्ण करावाच लागतो. उदाहरणार्थ: एखाद्या गुंतवणूकदाराला वाटते की निफ्टी निर्देशांक पुढच्या महिन्यात वाढेल. तो निफ्टीचा Future खरेदी करतो. जर अपेक्षेप्रमाणे निफ्टी वाढला, तर त्याला नफा होतो. पण जर निफ्टी घसरला, तर नुकसानही तितकेच निश्चित असते.
advertisement
Futures मध्ये पूर्ण रक्कम द्यावी लागत नाही. फक्त एक ठराविक टक्केवारी Margin म्हणून भरावी लागते. यामुळे कमी भांडवलात मोठ्या व्यवहाराची संधी मिळते. पण याच कारणामुळे नुकसानही झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे Futures Trading हे धाडसाचे आणि शिस्तीचे खेळ आहे.
आता येते या कथेतील दुसरे महत्त्वाचे पात्र – Options Trading.
Options Trading म्हणजे काय?
Options Trading मध्ये गुंतवणूकदाराला भविष्यात खरेदी किंवा विक्री करण्याचा अधिकार मिळतो, पण सक्ती नसते. म्हणजेच परिस्थिती अनुकूल नसेल, तर तो करार वापरण्याची गरज नाही. यासाठी गुंतवणूकदाराला आधीच एक ठराविक रक्कम द्यावी लागते, ज्याला Premium म्हणतात.
advertisement
Options चे दोन प्रकार असतात – Call Option आणि Put Option.
Call Option तेव्हा घेतला जातो, जेव्हा एखाद्या शेअरची किंमत वाढेल अशी अपेक्षा असते. Put Option तेव्हा घेतला जातो, जेव्हा किंमत घसरेल असे वाटते.
समजा एखादा तरुण गुंतवणूकदार आहे. त्याला वाटते की एखाद्या मोठ्या कंपनीचा शेअर पुढच्या महिन्यात नक्कीच वाढणार आहे. तो थेट शेअर न घेता Call Option घेतो. शेअर वाढला, तर त्याला कमी भांडवलात मोठा नफा मिळतो. पण शेअर अपेक्षेप्रमाणे वाढला नाही, तर त्याचे नुकसान फक्त भरलेल्या प्रीमियमपुरतेच मर्यादित राहते. त्यामुळे Options Trading थोडे सुरक्षित वाटते, पण तेवढेच गुंतागुंतीचेही असते.
advertisement
हे व्यवहार कसे होतात?
Futures आणि Options चे व्यवहार एक्सचेंजवर, म्हणजेच NSE किंवा BSE वर होतात. प्रत्येक कराराला ठराविक Expiry Date असते. साप्ताहिक किंवा मासिक. त्या तारखेपर्यंतच तो करार वैध असतो. गुंतवणूकदार आपल्या ट्रेडिंग खात्यातून हे करार खरेदी-विक्री करतात. दररोज नफ्या-तोट्याचा हिशेब बदलत राहतो आणि त्यानुसार खात्यात पैसे जमा किंवा वजा होत असतात.
advertisement
या व्यवहारांचा वापर फक्त नफा कमावण्यासाठीच केला जात नाही. अनेक मोठे गुंतवणूकदार आणि संस्था Futures आणि Options चा वापर जोखीम कमी करण्यासाठी करतात. उदाहरणार्थ: एखाद्याकडे आधीच मोठ्या प्रमाणात शेअर्स असतील आणि बाजार पडण्याची भीती वाटत असेल, तर तो Put Option घेऊन स्वतःचे नुकसान मर्यादित ठेवू शकतो.
Futures आणि Options Trading ही बाजारातील अतिशय शक्तिशाली साधने आहेत. योग्य ज्ञान, अनुभव आणि संयम असेल, तर ती आर्थिक यशाची वाट दाखवू शकतात. पण फक्त जलद नफ्याच्या आशेने, अभ्यासाशिवाय या व्यवहारात उतरल्यास तेच साधन मोठ्या नुकसानीचे कारणही ठरू शकते. म्हणूनच F&O Trading ही केवळ गुंतवणूक नसून, बाजार समजून घेण्याची आणि स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची एक कसोटी आहे.
view comments
मराठी बातम्या/मनी/
फ्युचर्स अँड ऑप्शन्स ट्रेडिंग म्हणजे काय? कसे होतात व्यवहार; सरकारने वाढवला टॅक्स, घोषणा होताच बाजार कोसळला
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement