advertisement

IPL 2026 : आरसीबीच्या कॅप्टनने मित्रालाच टीमबाहेर केलं, आयपीएलच्या पहिल्या सामन्यात दोस्ती तुटली?

Last Updated:

आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने सनरायजर्स हैदराबादवर 6 विकेटने विजय मिळवला आहे.

आरसीबीच्या कॅप्टनने मित्रालाच टीमबाहेर केलं, आयपीएलच्या पहिल्या सामन्यात दोस्ती तुटली?
आरसीबीच्या कॅप्टनने मित्रालाच टीमबाहेर केलं, आयपीएलच्या पहिल्या सामन्यात दोस्ती तुटली?
बंगळुरू : आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने सनरायजर्स हैदराबादवर 6 विकेटने विजय मिळवला आहे. हैदराबादने दिलेल्या 202 रनच्या आव्हानाचा पाठलाग आरसीबीने फक्त 15.4 ओव्हरमध्ये 4 विकेट गमावून पार केला. देवदत्त पडिक्कल, विराट कोहली आणि जेकब डफी हे आरसीबीच्या विजयाचे शिल्पकार ठरले. इम्पॅक्ट सब म्हणून खेळणाऱ्या पडिक्कलने तिसऱ्या क्रमांकावर बॅटिंगला येऊन 26 बॉलमध्ये 234.62 च्या स्ट्राईक रेटने 61 रनची खेळी केली, ज्यात 4 सिक्स आणि 7 फोरचा समावेश होता.
विराट कोहलीने 38 बॉलमध्ये 5 सिक्स आणि 5 फोरच्या मदतीने नाबाद 69 रनची खेळी केली. तर फास्ट बॉलर जेकब डफीने पॉवर प्लेमध्येच ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा या हैदराबादच्या धोकादायक ओपनर्सना स्वस्तात पॅव्हेलियनमध्ये पाठवलं.

पाटीदारने मित्रालाच बाहेर केलं

खरंतर या सामन्यात तिसऱ्या क्रमांकावर इम्पॅक्ट सब म्हणून बॅटिंगला आलेल्या देवदत्त पडिक्कलची खेळी मॅचचा टर्निंग पॉईंट ठरली. आरसीबीचा कर्णधार रजत पाटीदार याच्याकडे व्यंकटेश अय्यर याला इम्पॅक्ट सब म्हणून पाठवण्याची संधी होती, पण तरीही पाटीदारने पडिक्कलवर विश्वास दाखवला आणि त्याने हा विश्वास सार्थ ठरवला.
advertisement
देशांतर्गत क्रिकेटमध्ये रजत पाटीदार आणि व्यंकटेश अय्यर हे दोन्ही खेळाडू मध्य प्रदेशकडून खेळतात, पण तरीही रजत पाटीदारने त्याचाच मित्र असलेल्या व्यंकटेश अय्यरला टीमबाहेर ठेवण्याचा धाडसी निर्णय घेतला. व्यंकटेश अय्यर याला आरसीबीने यंदाच्या लिलावात 7 कोटी रुपयांना विकत घेतलं होतं, तर देवदत्त पडिक्कल याला 2 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं होतं.
आयपीएल 2025 नंतर केकेआरने व्यंकटेश अय्यरला रिलीज केलं होतं. आयपीएलच्या मागच्या हंगामात केकेआरने व्यंकटेश अय्यरसाठी 23.75 कोटी रुपये मोजले होते, पण त्याला या किंमतीला साजेशी खेळी करता आली नाही, त्यामुळे केकेआरने त्याला सोडण्याचा निर्णय घेतला.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : आरसीबीच्या कॅप्टनने मित्रालाच टीमबाहेर केलं, आयपीएलच्या पहिल्या सामन्यात दोस्ती तुटली?
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement