IPL 2026 : आरसीबीने 6 वर्षांचा कलंक एका झटक्यात पुसला... Result नाही Reason बघा!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा 6 विकेटने धुव्वा उडवला आहे. पहिल्या इनिंगमध्ये हैदराबादने 201 रनचा डोंगर उभारला, तेव्हा आरसीबीसाठी हे आव्हान कठीण जाणार असं वाटत होतं.
बंगळुरू : आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात गतविजेत्या आरसीबीने सनरायझर्स हैदराबादचा 6 विकेटने धुव्वा उडवला आहे. पहिल्या इनिंगमध्ये हैदराबादने 201 रनचा डोंगर उभारला, तेव्हा आरसीबीसाठी हे आव्हान कठीण जाणार असं वाटत होतं, कारण आरसीबीला मागच्या 6 वर्षात हैदराबादविरुद्ध 190 पेक्षा जास्त रन कधीच चेस करता आल्या नव्हत्या, पण आज इतिहास बदलण्यासाठीच आरसीबी मैदानात उतरली होती. देवदत्त पडिक्कलची वादळी बॅटिंग आणि किंग कोहलीच्या क्लासमुळे आरसीबीने हा सामना फक्त 15.4 ओव्हर्समध्येच जिंकला आणि सिझनची धमाकेदार सुरूवात केली.
कुणामुळे झाला आरसीबीचा विजय?
इम्पॅक्ट सब म्हणून येऊन देवदत्त पडिक्कलने 26 बॉलमध्ये 61 रन केल्या, यात त्याचा स्ट्राईक रेट हा तब्बल 234.61 चा होता. पडिक्कलच्या या स्ट्राईक रेटसमोर हैदराबादचे बॉलर्सही हतबल झाले.
विराट कोहलीनेही पडिक्कलला चांगली साथ दिली. आयपीएलमध्ये चेस करताना विराटच्या 4 हजार रन पूर्ण झाल्या आहेत. असा विक्रम करणारा तो आयपीएल इतिहासातला एकमेव खेळाडू आहे. विराटने या सामन्यात 34 बॉलमध्ये नाबाद 51 रन करून मॅच फिनिश केली.
advertisement
पदार्पणातच धमाका
आरसीबीसाठी पदार्पण करणाऱ्या जेकब डफीने 22 रन देऊन 3 विकेट घेतल्या, त्याने ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा या धोकादायक ओपनरना पॉवरप्लेमध्येच आऊट केलं.
कॅप्टन्स नॉक
या सामन्यात सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार इशान किशनने 38 बॉलमध्ये 80 रन केले, त्यामुळे हैदराबादने 20 ओव्हरमध्ये 201 रनपर्यंत मजल मारली.
- आरसीबीने हा सामना 6 विकेट्स आणि 26 बॉल राखून जिंकला.
advertisement
- आरसीबीने हैदराबादविरुद्ध 6 वर्षांनंतर पहिल्यांदाच 190 पेक्षा जास्त रन यशस्वीरित्या चेस केले आहेत.
- आरसीबीचा या मोसमातला हा सर्वात मोठा पॉवरप्ले स्कोअर होता, त्यांनी 6 ओव्हरमध्ये 1 विकेट गमावून 76 रन केले.
बॅटिंगला मदत करणारी खेळपट्टी
बंगळुरूची खेळपट्टी ही बॅटिंगला मदत करणारी म्हणून ओळखली जाते. लहान बाऊंड्री असल्यामुळे आरसीबीने 201 रनच्या आव्हानाचा पाठलागही अगदी सहज केला.
advertisement
कुठे फिरला सामना?
आरसीबीने पॉवरप्लेमध्येच 76 रन कुटल्या, ज्यामुळे त्यांचा रिक्वायर्ड रन रेट सुरूवातीलाच कमी झाला आणि त्यांना नंतर धोका पत्करावा लागला नाही. एवढंच नाही तर विराट कोहली 29 रनवर असताना हेनरिक क्लासेनने त्याचा सोपा कॅच सोडला, या एका चुकीमुळे हैदराबादने हा सामना गमावला. नंतर विराट कोहलीने हर्षल पटेलच्या एकाच ओव्हरमध्ये 6,4,4,4 मारून मॅच दणक्यात संपवली.
advertisement
विजय-पराभवाची कारणे
कमिन्स टीमबाहेर : या सामन्यात पॅट कमिन्स नसल्यामुळे हैदराबादची बॉलिंग विस्कळीत वाटली. या सामन्यात हैदराबादच्या बॉलरनी तब्बल 11 वाईड बॉल्स टाकले.
प्लान नाही : हैदराबादच्या बॉलरकडे आरसीबीच्या बॅट्समनना रोखण्यासाठी कोणताही प्लान नव्हता.
इम्पॅक्ट सबचा मास्टरस्ट्रोक : आरसीबीने देवदत्त पडिक्कलला तिसऱ्या क्रमांकावर पाठवण्याचा निर्णय मॅच विनिंग ठरला.
कसा जिंकला सामना?
advertisement
आरसीबीच्या सर्व बॅट्समननी 150 प्लसच्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली. इशान किशनने पहिल्या इनिंगमध्ये आरसीबीच्या स्पिन बॉलिंगवर आक्रमण केले, यानंतर आरसीबीनेही हैदराबादच्या स्पिनरना (हर्ष दुबे, इशान मलिंगा) यांना अजिबात सेट होऊ दिलं नाही.
इम्पॅक्ट सबचा मास्टरस्ट्रोक, कोहलीचा रेकॉर्डब्रेक धमाका!
आरसीबीची रणनीती या सिझनमध्येही किती शार्प आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं आहे. जेकब डफीने पॉवरप्लेमध्ये घेतलेल्या विकेट आणि पडिक्कलचा इम्पॅक्ट सब म्हणून झालेला वापर, या दोन गोष्टी आरसीबीसाठी गेम चेंजर ठरल्या. दुसरीकडे, पॅट कमिन्सची उणीव हैदराबादला प्रत्येक बॉलवर जाणवली. विराट कोहलीने चेस करताना 4 हजार रन्सचा टप्पा ओलांडून आपणच 'चेस मास्टर' आहोत हे पुन्हा एकदा जगाला दाखवून दिले. या विजयामुळे आरसीबीचा आत्मविश्वास वाढला असून, प्रतिस्पर्धी टीम्ससाठी हा एक मोठा धोक्याचा इशारा आहे.
Location :
Bangalore,Karnataka
First Published :
Mar 28, 2026 11:49 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : आरसीबीने 6 वर्षांचा कलंक एका झटक्यात पुसला... Result नाही Reason बघा!










