advertisement

IPL 2026 : ईशान किशनने पराभवाचं खापर कुणावर फोडलं? मॅचनंतर दिग्गजाच नाव घेऊन सुनावलं

Last Updated:

सनरायझर्स हैदराबादही 201 धावा करूनही हारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.त्यात सामन्यानंतर बोलताना ईशान किशनने पराभवाचं खापर कुणावर फोडलं आहे? हे जाणून घेऊयात.

ishan kishan
ishan kishan
RCB vs SRH : आयपीएल 2026 च्या पहिल्याच सामन्यात आरसीबीने 201 धावांच भलं मोठं आव्हान अवघ्या 94 बॉलमध्ये पूर्ण करत हंगामाची धमाकेदार सूरूवात केली होती. आरसीबीच्या या विजयाचा शिल्पकार हा विराट कोहली ठरला आहे. दरम्यान तिकडे सनरायझर्स हैदराबादही 201 धावा करूनही हारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.त्यात सामन्यानंतर बोलताना ईशान किशनने पराभवाचं खापर कुणावर फोडलं आहे? हे जाणून घेऊयात.
खरं तर या सामन्यातला टर्निंग पॉईंट ती कॅच ठरली होती.8 व्या ओव्हरच्या तिसऱ्या बॉलला हेन्री क्लासेनने विराट कोहलीची कॅच ड्रॉप केली होती.त्यावेळी विराट कोहली 28 धावांवर खेळत होता.जर तिकडे त्याची विकेट पडली असती तर मॅचचा निकाल वेगळा लागला असता.कारण कोहलीने नाबाद 69 धावांची खेळी केली होती.
दरम्यान या सामन्यानंतर बोलताना कॅप्टन ईशानने त्याला चांगलंच सुनावलं होतं. मला वाटतं की पहिल्या 3-4 षटकांनंतर खेळपट्टी नक्कीच चांगली खेळली. तुम्हाला माहीत आहे, आम्ही सुरुवातीलाच काही विकेट्स गमावल्या, आणि पुढच्या वेळी आम्हाला याची काळजी घ्यावी लागेल कारण, दुसऱ्या डावातील खेळपट्टी पाहता, त्यावर फलंदाजी करणे खूप सोपे होते आणि चेंडू चांगला उसळत होता. त्यामुळे हो, पुढच्या वेळी आम्हाला फटक्यांची निवड करताना थोडे हुशारीने खेळावे लागेल. पण हो, खेळपट्टीचा खेळ चुकल्यानंतर आम्ही चांगली कामगिरी केली, ज्यामुळे आमचा आत्मविश्वास खूप वाढला आहे,असे ईशानने म्हटलेय
advertisement
फलंदाजांनाही श्रेय द्यावे लागेल, ज्या प्रकारे ते फलंदाजी करत होते, त्यातही विराट भाईने पाठलाग करताना. त्याची विकेट लवकरात लवकर घेणे खूप महत्त्वाचे आहे. नाहीतर, जर तो असाच खेळत राहिला, तर त्याला थांबवणे कठीण होईल. आम्हाला थोडी अधिक मेहनत करावी लागेल. हा पहिलाच सामना आहे आणि सध्यासाठी या चुका स्वीकारार्ह आहेत, असे बोलत ईशान किशनने त्या कॅच ड्रॉपवर बोलून क्लासेनला सर्वासमोर सुनावलं.
advertisement
तसेच आम्ही गोलंदाजीमध्ये थोडे अधिक सावध राहू, ज्या क्षेत्रांमध्ये आम्हाला सुधारणा करण्याची गरज आहे, आणि कदाचित या सामन्यातून आम्ही अधिक मजबूत होऊ. खरं तर मला खूप मजा आली, प्रत्येक क्षणाचा आनंद घेतला. ही आयपीएल आहे, त्यामुळे कधीकधी दडपण येतं. पण एक संघ म्हणून आम्ही यातून अधिक चांगले खेळू. कर्णधारपदाबद्दल मी आणखी काय बोलू शकतो? जर आम्ही पुढचे सामने जिंकलो, तर स्पर्धेत पुढे जाणे आमच्यासाठी खूप सोपे होईल,असे तो शेवटी म्हणाला आहे.
view comments
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
IPL 2026 : ईशान किशनने पराभवाचं खापर कुणावर फोडलं? मॅचनंतर दिग्गजाच नाव घेऊन सुनावलं
Next Article
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी; घराची किंमत ऐकून थक्क व्हाल
शुभमन गिलने मुंबईत फ्लॅट बुक केला, इनसाईड डिटेल्स आले समोर; कोटींची फक्त स्टॅम्प ड्युटी
  • कोटींचा टॅक्स भरून गिलने 'या' मजल्यावर बुक केला फ्लॅट

  • नव्या घराचे इनसाईड डिटेल्स आले समोर

  • 3300 स्क्वेअर फुटांचा फ्लॅट अन् बरंच काही...

View All
advertisement