advertisement

New Rules from 1st February 2026: तुमच्या खिशावर थेट परिणाम! FASTag केवायसीपासून ते गॅस दरापर्यंत... १ फेब्रुवारीपासून काय बदललं?

Last Updated:

फास्टॅगचं टेन्शन मिटलं, पण सिगारेट महागली! १ फेब्रुवारीपासून देशात लागू झाले 'हे' ५ मोठे बदल; पाहा संपूर्ण यादी

News18
News18
New Rules : कॅलेंडरचं पान उलटलं की तारखेसोबतच आपल्या आयुष्याशी जोडलेले अनेक गणितेही बदलतात. १ फेब्रुवारीची ही सकाळ केवळ एका नवीन महिन्याची सुरुवात घेऊन आलेली नाही, तर ती आपल्या खिशावर आणि दैनंदिन जगण्यावर थेट परिणाम करणारे काही महत्त्वाचे निर्णयही सोबत घेऊन आली आहे. सकाळी उठल्यावर चहाच्या टपरीवर होणारी चर्चा असो किंवा हायवेवरून प्रवास करताना फास्टॅगची लागणारी कटकट; सरकारचे हे नवीन नियम थेट आपल्या घराच्या बजेटला स्पर्श करतात.
कुणाला फास्टॅगच्या नियमातून दिलासा मिळालाय, तर कुणाला सिगारेटच्या वाढत्या किमतींमुळे आपला छंद आवरता घ्यावा लागणार आहे. गॅस सिलिंडरपासून ते शेअर बाजारापर्यंतच्या या बदलांचा नेमका अर्थ काय? आणि या धावपळीच्या आयुष्यात हे ५ नियम तुमच्या खिशावर कसं 'वार' करणार आहेत, हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. कारण नियम जरी कागदावर बदलत असले, तरी त्याचा खरा परिणाम सामान्य माणसाच्या आयुष्यावर होत असतो."
advertisement
१. फास्टॅग नियमात बदल
महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) नवीन फास्टॅगसाठी 'नो युवर व्हेईकल' (KYV) प्रक्रिया बंद केली आहे. आता कार, जीप आणि व्हॅनसाठी नवीन फास्टॅग घेताना पोस्ट-इश्यूअन्स केवायसीची कटकट राहणार नाही. जुन्या फास्टॅग वापरकर्त्यांसाठीही आता नियमित केवायसी अनिवार्य नसेल, केवळ तक्रार प्राप्त झाल्यासच त्याची तपासणी केली जाईल.
advertisement
२. सिगारेट आणि तंबाखू उत्पादनं महाग
धूम्रपान करणाऱ्यांच्या खिशाला आता कात्री लागणार आहे. सरकारने तंबाखूजन्य पदार्थांवरील ड्युटी दरांमध्ये सुधारणा केल्यामुळे १ फेब्रुवारीपासून सिगारेट महाग झाली आहे. विशेषतः फिल्टर आणि लांब सिगारेटच्या किमतीत मोठी वाढ दिसून येईल. यासोबतच जर्दा, गुटखा आणि पान मसाल्याच्या किमतींवरही याचा परिणाम होणार आहे.
३. गॅस सिलिंडरच्या किमतीत सुधारणा
दर महिन्याच्या १ तारखेला गॅस सिलिंडरच्या किमतींचा आढावा घेतला जातो. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या दरात बदल होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक सिलिंडरच्या दरातील बदलाचा परिणाम हॉटेलमधील खाण्यापिण्यावर होऊ शकतो.
advertisement
४. सीएनजी, पीएनजी आणि विमान इंधन दर बदलले
केवळ स्वयंपाकाचा गॅसच नाही, तर सीएनजी आणि पीएनजीच्या दरातही आज सुधारणा अपेक्षित आहे. तसेच विमान इंधनाच्या (ATF) किमती बदलल्यामुळे विमान प्रवासाचे भाडे महाग किंवा स्वस्त होऊ शकते.
५. अर्थसंकल्प आणि शेअर बाजार
आज १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन देशाचा अर्थसंकल्प सादर करत आहेत. विशेष म्हणजे, आज रविवार असूनही अर्थसंकल्पामुळे शेअर बाजार (NSE आणि BSE) नियमित वेळेनुसार सुरू राहणार आहे. गुंतवणूकदारांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा ठरेल.
view comments
मराठी बातम्या/मनी/
New Rules from 1st February 2026: तुमच्या खिशावर थेट परिणाम! FASTag केवायसीपासून ते गॅस दरापर्यंत... १ फेब्रुवारीपासून काय बदललं?
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement