Share Market: बजेटमुळे आज शेअर मार्केट सुरू राहणार, पण ट्रेडिंग करता येणार का?
- Published by:Kranti Kanetkar
Last Updated:
मुंबई शेअर बाजार आणि NSE आज रविवार असूनही पूर्णवेळ सुरू आहेत, अर्थसंकल्पाच्या घोषणांसाठी हा ऐतिहासिक निर्णय घेतला गेला आहे. MCX, NCDEX देखील आज खुले आहेत.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
तुम्ही शुक्रवारी (३० जानेवारी) खरेदी केलेले शेअर्स आज (रविवारी) विकू शकत नाही. तसेच आज खरेदी केलेले शेअर्स सोमवारी विकता येणार नाहीत. इक्विटी आणि F&O मध्ये इंट्राडे ट्रेडिंगला परवानगी आहे, मात्र नफा/तोटा सोमवारी सेटल होईल. बँका बंद असल्याने नियमित बँकिंग चॅनेलद्वारे पैसे येण्यास उशीर होऊ शकतो; व्यवहार सुरळीत करण्यासाठी UPI वापरण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
advertisement
गेल्या १५ वर्षांचा इतिहास पाहिला तर बजेटच्या दिवशी बाजार सरासरी फक्त ०.१९% हलतो, म्हणजेच फार मोठी उलथापालथ होत नाही. मात्र, यंदा गुंतवणूकदारांच्या अपेक्षा 'म्युटेड' (साध्या) आहेत. सरकार पायाभूत सुविधा, संरक्षण, आणि अक्षय ऊर्जा, क्षेत्रासाठी मोठ्या तरतुदी करेल, अशी आशा आहे. जर सरकारने कोणताही नकारात्मक 'सरप्राईज' दिला नाही, तर बाजार स्थिर राहण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.








