तुमच्या स्वयंपाकघरातील मसाले भेसळयुक्त तर नाही; करा ‘या’ सोप्या चाचण्या आणि 5 सेकंदात तपासा भेसळ
- Published by:Tushar Shete
Last Updated:
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी निरोगी राहावे असे वाटत असेल, तर तुम्हाला खऱ्या आणि बनावट मसाल्यांमध्ये फरक ओळखताच यायला पाहिजे. मसाल्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्हाला फार पैसे खर्च करण्याची गरज नाही. अगदी साधी, सोपी पद्धत वापरून तुम्ही मसाल्यांची शुद्धता तपासू शकता आणि ती ही घरच्या घरी अवघ्या 5 मिनिटांत.
मुंबई : स्वयंपाक चटकदार होण्यासाठी गृहिणी विविध प्रकारचे मसाले वापरतात. हळद, लाल मिरची पावडर (मसाला), गरम मसाला, जिरे, काळी मिरी पूड इ. आजकाल, बाजारातील विविध प्रकारचे मसाले उपलब्ध आहेत. काही लोक आजही मिक्सरमध्ये पूड बनवून मसाला वापरात. मसाला उत्पादक दुकानदार सुट्टे मसालेही विकतात. मात्र आपण जो मसाला खातोय की शुद्ध आहे की भेसळयुक्त, कोणता मसाला अन्नाची चव वाढवेल, हे कळत नाही.
खऱ्या आणि भेसळयुक्त मसाल्यांमध्ये फरक कसा ओळखावा ?
मसालेदार पदार्थ खाल्ल्यानेही आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही खात असलेला मसाला भेसळयुक्त तर नाही ना अशी शंका मनात नक्कीच येऊ शकते. मसाल्याची शुद्धता तपासण्यासाठी तुम्हाला फार पैसे खर्च करण्याची गरज नाही. अगदी साधी, सोपी पद्धत वापरून तुम्ही मसाल्यांची शुद्धता तपासू शकता आणि ती ही घरच्या घरी अवघ्या 5 मिनिटांत.
advertisement
1) मसाला (लाल मिरची पावडर)
बऱ्याच महिला जेवणामध्ये मसाल्याच्या वापर करतात. विशेषतः ज्यांना मांसाहारी पदार्थ खायला आवडतात. तुम्ही बाजारातून आणलेला मसाला भेसळयुक्त आहे का ? हे ओळखण्यासाठी तो पाण्यात टाका. शुद्ध आणि चांगल्या क्वॉलिटीचा मसाला असेल तर प्रथम तो पाण्यावर तरंगेल, नंतर तो हळूहळू खाली बसेल. पण, जर मसाला नकली किंवा भेसळयुक्त असेल तर पाण्यात टाकताच खाली बसेल.
advertisement
2) हळद पावडर
वरण किंवा अन्य डाळ, भाज्यांमध्ये वापरली जाणारी हळद खरी की बनावट हे जाणून घेण्यासाठी आधी थोडी हळद पाण्यात घाला. मसाल्याप्रमाणेच ती आधी तरंगेल नंतर हळूहळू पाण्यात उतरेल आणि पाण्याला हलकासा पिवळा रंग देईल. पण तुमची भेसळयुक्त हळद लगेचच बसेल पाण्याला सूर्यासारखा तांबूस पिवळा रंग येईल.
advertisement
3) जिरं
जिऱ्यांची शुद्धाता तपासण्यासाठी थोडं जिरं तुमच्या हातात घेऊन ते चोळा. जिरं स्वच्छ तर होईलच मात्र तुमचे हात घाण होणार नाहीत. मात्र जर जिऱ्यांमध्ये भेसळ असेल तर तुमचे हात काळे होतील.

4) काळी मिरी
काळ्या मिरीचा वापर मांसाहारी जेवणामध्ये होतोच होतो. मात्र आता शाकाहारी व्यक्तीसुद्धा चवीसाठी काळ्या मिरीचा वापर त्यांच्या जेवणात करू लागलेत. तुमच्या किचनमधल्या काळ्यामिरीतली भेसळ ओळखण्यासाठी काळ्या मिरीचे काही दाणे पाण्यात टाका. शुद्ध काळी मिरी लगेलच पाण्याखाली जाईल. भेसळयुक्त काळी मिरी पाण्यावर तरंगत राहिल. अशुद्ध आणि भेसळयुक्त काळी मिरी खाण्याने अनेक तोटे असू शकतात, त्यामुळे ती फेकून देणे चांगले.
advertisement
5) हिंग
हिंगामुळे अपचनाच्या समस्या दूर होऊन पोट साफ व्हायला मदत होते. लहान मुलांच्या पोटदुखीवर हिंगपाणी हा उत्तम पर्याय आहे. त्यामुळे हिंग हा जवळपास प्रत्येक भाजीत वापरला जाणारा पदार्थ आहे. अशा स्थितीत तुमच्या किचनमधलं हिंग शुद्ध असायलाच हवं अन्यथा तुमच्या आरोग्याला मोठा धोका पोहचू शकतो. हिंगाची शुद्धता तपासण्यासाठी हिंग घेऊन ते जाळण्याचा प्रयत्न करा. खरं हिंग लगेच जळेल. मात्र हिंगात जर भेसळ असेल तर ते जळणार नाही.
advertisement
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांनी निरोगी राहावे असे वाटत असेल, तर तुम्हाला खऱ्या आणि बनावट मसाल्यांमध्ये फरक ओळखताच यायला पाहिजे. घरच्याघरी भेसळ ओळखण्याची ही पद्धत तुमच्या नातेवाईक आणि मित्रांना नक्की सांगा .
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
November 17, 2024 4:02 PM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तुमच्या स्वयंपाकघरातील मसाले भेसळयुक्त तर नाही; करा ‘या’ सोप्या चाचण्या आणि 5 सेकंदात तपासा भेसळ