तीन मसाले 10 दिवसांत फुफ्फुस करतील स्वच्छ, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Last Updated:

सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सिगारेटचं व्यसन करते. सिगारेटमुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरसह इतर 14 प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. त्

News18
News18
आपल्या आजूबाजूला असणारे अनेक जण सिगारेट ओढतात. काही जण कधी तरी हौस म्हणून ओढतात, तर काही जणांना सिगारेटचं व्यसन लागलेलं असतं. सिगारेटच्या पाकिटांवर वॉर्निंग लिहिलेली असूनही त्यांना काही फरक पडत नाही. काही जणांना आपल्या चुकीची जाणीव होते आणि ते स्मोकिंग सोडून देतात. स्मोकिंगमुळे घातक रसायनं आणि टार फुफ्फुसांत जमा झालेला असतो. ही फुफ्फुस स्वच्छ कशी करायची, याची त्यांना भीती वाटते. 'नवभारत टाइम्स'ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
फुफ्फुसात घाण जमा असल्याची लक्षणं : जेव्हा आपल्या फुफ्फुसात कफ किंवा टारसारखी घाण जमा होते तेव्हा श्वसनमार्गात अडथळा निर्माण होतो. यामुळे कोरडा खोकला येतो. जे स्मोकिंग करतात त्यांना दिवसभर खोकला येत असतो. प्रदूषणामुळेदेखील फुफ्फुस ब्लॉक होऊ शकतं आणि संसर्ग होऊ शकतो.
स्मोकिंग सोडल्यानंतर फुफ्फुस स्वच्छ करण्याचे उपाय
डॉक्टर निशांत गुप्ता यांनी सांगितलं, की दिवसभर खोकणाऱ्या माणसांमुळे इतरांनाही त्रास होतो. तसंच, या समस्येमुळे फुफ्फुसं हळूहळू खराब होऊ शकतं. हे टाळण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपचार करू शकता. जायफळ, दालचिनी आणि चक्रफूल हे मसाले उपयुक्त ठरू शकतात. जायफळ, दालचिनी आणि चक्रफूल समान प्रमाणात एकत्र करावं. ही पावडर मधासोबत सकाळी व संध्याकाळी खावी. 10 दिवसांत फुफ्फुसं सुरळीत काम करू शकेल. फुफ्फुसांच्या संसर्गापासून संरक्षण करण्यासदेखील हा उपाय मदत करील.
advertisement
जायफळ आहे नैसर्गिक लंग क्लीनर
जायफळ आपल्या नैसर्गिक शुद्धीकरण गुणधर्मांसाठी ओळखलं जातं. जायफळामुळे बॅक्टेरियाच्या संसर्गास प्रतिबंध होतो आणि फुफ्फुसाची सूज कमी करून घाण काढून टाकण्यास मदत होते. त्यातले अँटीऑक्सिडंट्स फुफ्फुसाच्या पेशींचं नुकसान होण्यापासून थांबवतात. जायफळाचा वापर करून श्वासाची दुर्गंधीदेखील दूर केली जाऊ शकते.
दालचिनी आणि चक्रफूल
दालचिनीमध्ये औषधी गुणधर्म आहेत. हे गुणधर्म श्वसनाच्या आजारांना प्रतिबंधित करतात. फुफ्फुसांच्या कार्यात अडथळा आणणारी घाण स्वच्छ करण्यास दालचिनी मदत करते. खोकला आणि छातीतल्या वेदना दूर करण्यासाठी चक्रफूल उपयुक्त ठरतं.
advertisement
सध्याची तरुण पिढी मोठ्या प्रमाणात सिगारेटचं व्यसन करते. सिगारेटमुळे फुफ्फुसाच्या कॅन्सरसह इतर 14 प्रकारचा कॅन्सर होऊ शकतो. त्यामुळे सिगारेट ओढण्याची सवय असेल तर आजपासूनच ती बदला. तरुण वयात या गोष्टींचा फार त्रास जाणवत नाही; मात्र या गोष्टीमुळे कॅन्सरसारखे गंभीर आजार सहज जडू शकतात.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
तीन मसाले 10 दिवसांत फुफ्फुस करतील स्वच्छ, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement