कर्वेनगरमध्ये मृत्यूचा सापळा! दुचाकीस्वाराचा चालत्या गाडीवर अचानक चर्रकन चिरला गळा अन् रस्त्यावर रक्ताचा सडा, पुण्यात खळबळ
- Published by:Kiran Pharate
- local18
Last Updated:
पुण्यातील कर्वेनगर परिसरात बुधवारी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. दुचाकीवरून मित्रासोबत जात असताना रस्त्यावर अचानक आलेल्या दोरीमुळे एका तरुणाचा गळा गंभीररीत्या चिरला गेला.
पुणे: पुण्यातील कर्वेनगर परिसरात बुधवारी दुपारी काळजाचा थरकाप उडवणारी घटना घडली. दुचाकीवरून मित्रासोबत जात असताना रस्त्यावर अचानक आलेल्या दोरीमुळे एका तरुणाचा गळा गंभीररीत्या चिरला गेला. रक्तबंबाळ अवस्थेत या तरुणाला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याची प्रकृती चिंताजनक आहे. झाडाच्या फांद्या तोडताना सोसायटी आणि ठेकेदाराने दाखवलेला बेजबाबदारपणा एका निष्पाप तरुणाच्या जीवावर उठला आहे.
नेमकी घटना काय?
रामेश्वर अवतीकर आणि त्याचा मित्र सुधीर लांडगे (वय २३) हे दोघे दुपारी दोनच्या सुमारास भुजबळ बंगल्याजवळून दुचाकीवरून जात होते. मेघराज सोसायटीसमोर अचानक त्यांच्या गळ्याला एक दोरी अडकली. फांद्या तोडण्यासाठी वापरली जाणारी ही दोरी रस्त्यावर आलेली दुचाकीस्वाराला दिसली नाही. गाडी वेगात असल्याने दोरी थेट रामेश्वरच्या गळ्यात अडकली गेली आणि त्याचा गळा गंभीररीत्या कापला गेला. गळ्यातून होणारा प्रचंड रक्तस्राव आणि कापलेली अन्ननलिका यामुळे रामेश्वर जागीच कोसळला.
advertisement
नियमांची पायमल्ली आणि ठेकेदाराचा मनमानी कारभार
तपासात असे समोर आले आहे की, मेघराज सोसायटीने फांद्या तोडण्याची परवानगी घेतली होती, पण काम करताना सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले होते. एक तर त्यांनी हे काम करताना रस्ता बंद केला नाही. फांद्या तोडताना पोलिसांची परवानगी घेऊन रस्ता बंद करणे आवश्यक होते, जे केले गेले नाही. दुसरं म्हणजे,महापालिकेचे उद्यान अधीक्षक किंवा मिस्त्री यांच्या देखरेखीखाली हे काम होणे गरजेचे होते. तसंच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना धोक्याची पूर्वकल्पना देणारा कोणताही फलक तेथे लावलेला नव्हता.
advertisement
ठेकेदारावर गुन्हा दाखल
स्थानिक नागरिकांनी तातडीने जखमी रामेश्वर आणि सुधीरला खासगी रुग्णालयात दाखल केले. याप्रकरणी सुधीर लांडगे याने दिलेल्या फिर्यादीवरून अलंकार पोलीस ठाण्यात अज्ञात ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महापालिकेच्या सहाय्यक आयुक्त अस्मिता तांबे यांनी रुग्णालयात भेट देऊन या प्रकरणाची माहिती घेतली असून दोषींवर कठोर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Feb 12, 2026 9:22 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
कर्वेनगरमध्ये मृत्यूचा सापळा! दुचाकीस्वाराचा चालत्या गाडीवर अचानक चर्रकन चिरला गळा अन् रस्त्यावर रक्ताचा सडा, पुण्यात खळबळ







