advertisement

एका सेंकदात दोघांचा मृत्यू, जत्रेमधला पाळणा कोसळला, थरकाप उडवणारा Live Video

Last Updated:

जत्रेमध्ये पाळणा कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये वाचवायला गेलेल्या एका पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे.

एका सेंकदात दोघांचा मृत्यू, जत्रेमधला पाळणा कोसळला, थरकाप उडवणारा Live Video
एका सेंकदात दोघांचा मृत्यू, जत्रेमधला पाळणा कोसळला, थरकाप उडवणारा Live Video
जत्रेमध्ये पाळणा कोसळून झालेल्या अपघातामध्ये दोन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये वाचवायला गेलेल्या एका पोलीस निरीक्षकाचाही समावेश आहे. या भयावह अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. पाळणा कोसळल्यामुळे 9 जण जखमी झाले आहेत. शनिवारी संध्याकाळी ही 6.15 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. हरियाणाच्या फरीदाबादमध्ये सुरजकूंड जत्रेमध्ये ही दुर्घटना घडली आहे.
'पाळणा कोसळत असताना पाहिल्यानंतर पोलीस निरीक्षक त्यांना वाचवायला गेला, पण राईडचा एक भाग त्याच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर आदळला. अपघातामध्ये 13 जण जखमी झाले आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत', अशी माहिती फरिदाबादचे पोलीस उपायुक्त आयुष सिन्हा यांनी दिली आहे.
advertisement
जत्रेमधल्या जॉयराईड चालकाविरुद्ध एफआयआर नोंदवला जाईल आणि चौकशी केली जाईल, असं पोलीस उपायुक्त म्हणाले आहेत. पाळणा कोसळत असल्याचं दिसल्यानंतर पाळण्यात बसलेले लोक आणि तिथे उपस्थित असलेले जोरात किंचाळायला लागले, हे पाहून पोलीस निरीक्षक स्वत:च्या जीवाची पर्वा न करता पाळण्याच्या दिशेने गेला.
या घटनेवर प्रतिक्रिया व्यक्त करताना हरियाणाचे मुख्यमंत्री नायब सिंह सैनी यांनी जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केले. 'फरिदाबादमध्ये आयोजित सूरजकुंड मेळ्यादरम्यान झालेल्या अपघातामुळे मला अत्यंत दुःख झाले आहे. या अपघातात ज्यांनी आपला जीव गमावला त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी तीव्र संवेदना व्यक्त करतो," असं मुख्यमंत्री नायब सिंह सैनी म्हणाले आहेत.
view comments
मराठी बातम्या/देश/
एका सेंकदात दोघांचा मृत्यू, जत्रेमधला पाळणा कोसळला, थरकाप उडवणारा Live Video
Next Article
PBKS vs GT : आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
आयपीएलच्या इतिहासातली सर्वांत मोठी चूक, 19.5 व्या बॉलला काय घडलं? विश्वास बसणार नाही असा ड्रामा
  • आयपीएलमध्ये पहिल्यांदाच असं घडलं

  • शेवटच्या ओव्हरला काय घडलं

  • सोशल मीडियावर प्रचंड टीका

View All
advertisement